खाडीपुलाच्या मार्गाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:01 PM2019-07-23T23:01:26+5:302019-07-23T23:01:36+5:30
बाधित होण्याची भीती? : भाईंदर - नायगाव खाडी पुलाचा उताराचा मार्ग बदला
आशिष राणे
वसई : नायगाव ते भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत जोडणाऱ्या भाईंदर-नायगाव खाडी पुलाच्या प्रस्तावित मार्गाला नायगाव कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यात नायगाव कोळीवाडा येथे राहणाºया स्थानिक मच्छीमार नागरिकांच्या मच्छी सुकविण्याच्या व इतर सार्वजनिक वापराच्या जागेतून हा खाडी पूल जाणार असल्याने गावांतील मच्छीमार यामुळे बाधित होणार आहेत. यामुळेच हा विरोध असून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी शनिवारी आयोजित एका सभेत चर्चा करण्यात आली.
भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिश कालीन पूल वापरासाठी देण्याची तेथील नागरिकांची जुनी मागणी होती. परंतु हा जुना खाडी पूल कमकुवत असल्याने त्याला पूर्वीच केंद्र सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र याला पर्याय म्हणून भाईंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी मागणी समोर आली. हा पूल तयार झाला तर वसई-विरारकर हे भाईंदरला अवघ्या १० ते १२ मिनिटांत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून जाण्यासाठी लागणारा एक ते दीड तास वाचणार आहे. या पुलासाठी निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा लवकरच मागविण्यात येईल.
सर्व्हे क्र. १२ मधून जातोय उतार ; त्यालाच होतोय विरोध?
या पुलाचा उतार हा नायगाव येथील मच्छीमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर प्रस्तावित असल्याने स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. मुख्य म्हणजे स्थानिकांना विश्वासात न घेता हा उतार येथे देण्यात येणार असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. ज्यावेळी सर्वेक्षणासाठी या भागात अधिकारी आले त्यावेळी ही पुलाच्या उताराची बाब समोर आल्याचे ही गावकºयांनी सांगितले. त्यानंतर तात्काळ येथील कोळी बांधवांनी स्थानिक स्तरावर सभा घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाºयांना स्थानिकां सोबत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शनिवारी सभा संपन्न झाली.
या सभेत स्थानिकांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. नायगाव या भागात सर्वे क्र मांक १२ ही मच्छीमार समाजासाठी सार्वजनिक वापराची जागा आहे. ही जागा नायगाव येथील मच्छीमार संस्थेच्या नावे आहे. या हक्काच्या जागेत मच्छीमार बांधवांच्या मार्फत मासळी सुकविणे, जाळ्याचे विणकाम करणे, बोटीची दुरु स्ती करणे व खेळण्यासाठी मैदान म्हणून या जागेचा वापर होतो. परंतु या जागेतून भार्इंदर नायगाव खाडीपूल जाणार असल्याने आता अन्य नागरिकांसाठी जरी हा मार्ग सोयीचा असला तरी येथील स्थानिक मच्छीमार बांधव यामध्ये बºयापैकी भरडला जाणार आहे, असेही संतप्त गावकºयांनी सांगितले,
पावसाळ्यात मासेमारी बंदी कालावधीमध्ये हे मच्छीमार सुक्या मासळीची विक्री मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे ही मासळी सुकविण्याचे काम मार्च ते मे दरम्यान होत असते. यासाठी हे मच्छीमार या जागेचा वापर करतात. तर, दुसरीकडे मच्छीमार येथे बोटीही ठेवतात. जर या जागेतून हा खाडी पूल गेला तर मच्छीमारांचे मोठे नुकसान होईल, असा दावाच गावकºयांनी केला आहे.