व्हीआयपीमुळे घोलवड उजळले
By admin | Published: March 31, 2017 05:22 AM2017-03-31T05:22:13+5:302017-03-31T05:22:13+5:30
उद्योजकांची सामाजिक बांधिलकी जपत व्हीआयपी क्लोदिंग कंपनीने घोलवड गावात ४३ ठिकाणी खांब
अनिरुद्ध पाटील / बोर्डी
उद्योजकांची सामाजिक बांधिलकी जपत व्हीआयपी क्लोदिंग कंपनीने घोलवड गावात ४३ ठिकाणी खांब, वायर्स आणि एलईडी दिव्यांची सुसज्य प्रकाशयोजना केली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ललिता जयकुमार पाठारे यांच्या हस्ते उदघाटन करून हा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी कंपनीचे डायरेक्टर कपिल पाठारे, अश्विनी पाठारे, जनरल मॅनेजर दीपक चुरी उपस्थित होते. सरपंच राजश्री कोल, उपसरपंच हरकचंद शाह, ग्रामविकास अधिकारी टी. आर. सावे यांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे. यावेळी घोलवड व बोर्डीग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
घोलवड रेल्वे स्थानक ते खुटखाडी आणि रेल्वे फाटक ते प्राथमिक केंद्र या मार्गावर ४५ ठिकाणी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. पहाटे तसेच रात्री उशिराने प्रवास करणऱ्या प्रवाशांना आणि आरोग्य केंद्रात येणारे रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणार आहे.
यासह पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण होण्यास मदत झाली आहे. दोन वर्षांपूर्वी बोर्डी गावात हा उपक्रम राबविण्यात आला होता. दर्शन पाटील यांचा या मध्ये मोलाचा वाटा आहे. (वार्ताहर)