अल्पवयीन मुलीचा विनयभंग व्हिडीओ क्लिप व्हायरल

By admin | Published: December 31, 2016 03:59 AM2016-12-31T03:59:21+5:302016-12-31T03:59:21+5:30

विक्रमगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अलोंडे गावातील तरूणाने अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना २७ एप्रिलला घडली असून तिची वाडा पोलिसात आज नोंद करण्यात आली आहे.

Viral the molestation video clip of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग व्हिडीओ क्लिप व्हायरल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग व्हिडीओ क्लिप व्हायरल

Next

वाडा : विक्रमगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अलोंडे गावातील तरूणाने अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना २७ एप्रिलला घडली असून तिची वाडा पोलिसात आज नोंद करण्यात आली आहे.
विक्र मगड तालुक्यातील ही मुलगी वाडा येथील शाळेत शिकत होती. तिला कुणाल बोडके या तरूणाने २७ एप्रिलला सायंकाळी दमदाटी करून एका कारमध्ये बसविले व मलवाडा रोडला असणाऱ्या एका निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले, जर कुणाला हे सांगितलेस तर तुला व कुटुंबाला ठार मारून टाकीन अशी धमकीही दिली. धक्कादायक म्हणजे या प्रकाराची क्लिप बनवून या तरुणाने ती व्हायरल केली याची माहिती तरुणीच्या नातेवाईकाने तिच्या कुटुंबियांना सांगितल्यावर याबाबत वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक या प्रकरणी तपास करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Viral the molestation video clip of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.