Virar Covid Hospital Fire: ...अन् १३ रुग्ण घुसमटून, होरपळून मृत्यूमुखी पडले; कालच लागली होती दुर्घटनेची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:02 AM2021-04-23T09:02:45+5:302021-04-23T09:03:08+5:30

Virar Covid Hospital Fire: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू; नातेवाईकांचे रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

Virar Covid Hospital Fire 13 ICU patients die as fire breaks out at Vijay Vallabh Hospital | Virar Covid Hospital Fire: ...अन् १३ रुग्ण घुसमटून, होरपळून मृत्यूमुखी पडले; कालच लागली होती दुर्घटनेची चाहूल

Virar Covid Hospital Fire: ...अन् १३ रुग्ण घुसमटून, होरपळून मृत्यूमुखी पडले; कालच लागली होती दुर्घटनेची चाहूल

Next

विरार: विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयूचा रात्री ३.१५ च्या सुमारास स्फोट झाला. यावेळी एकूण १७ जण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. आगीची घटना घडताच आयसीयूच्या दरवाज्याजवळ असलेल्या ४ रुग्णांनी तिथून पळ काढला. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या चारपैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. संपूर्ण परिसरात आक्रोश ऐकू येत होता. आपल्या कुटुंबातील सदस्य बरा होऊन परतेल अशी आशा अनेकांना होती. मात्र आपल्या जीवाभावाची व्यक्ती हिरावल्यानं अनेकांनी हंबरडा फोडला. आपल्या जवळच्या व्यक्ती गमावणाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनानं गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी दुर्घटना घडली, त्यावेळी तिथे कर्मचाऱ्यांपैकी कोणीही नव्हती, असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. कर्मचारी आयसीयूमध्ये उपस्थित असते, तर इतक्या रुग्णांचे प्राण गेले नसते, अशा प्रतिक्रिया नातेवाईकांकडून उमटत आहेत.

मोठी दुर्घटना! विरारच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. ४३ वर्षांच्या सुप्रिया देशमुख या मृतापैकीच एक. त्यांची बहिण काल त्यांना भेटण्यासाठी गेली होती. 'मी वैद्यकीय कर्मचारी आहे. काल मी माझ्या बहिणीसाठी पेज घेऊन गेले होते. तेव्हा आयसीयूमधील एसीमध्ये बिघाड झाला होता. एक कर्मचारी एसीचा फ्लॅप उघडून बघत होता. एसी वर्किंग नसताना ज्याप्रकारचा वास येतो, तसा वास त्यावेळी येत होता आणि रुग्णांसाठी पंखे लावण्यात आले होते. या दुर्घटनेची माहिती मला बाजूच्या बेडवर असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून समजली. त्यांनी मला रात्री कॉल केला होता,' असं देशमुख यांच्या बहिणीनं सांगितलं.

रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासावर अनेक आरोप केले आहेत. रुग्ण दाखल करून घेताना आमच्याकडून तातडीनं ५० हजार रुपये घेण्यात आले. एका तासात पैशांची व्यवस्था करायला लावली. मात्र ज्यावेळी दुर्घटना घडली, तेव्हा आयसीयूमध्ये एकही कर्मचारी नव्हता, असा आरोप एका नातेवाईकानं केला. 

Web Title: Virar Covid Hospital Fire 13 ICU patients die as fire breaks out at Vijay Vallabh Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.