Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:59 PM2021-04-23T12:59:16+5:302021-04-23T13:06:49+5:30

Virar Hospital Fire : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Virar Hospital Fire: Rs 5 lakh assistance from the Municipal Corporation to the families of the victims of the accident - Eknath Shinde | Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे

Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे

Next
ठळक मुद्देवसई-विरार महापालिकेच्यावतीनेही मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

विरार : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त वसई-विरार महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर येथील मुंबई महापालिकेच्या कोव्हीड सेंटर येथे हलवले, तर अन्य रुग्णांना विरार मधीलच विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातलगांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.  

(Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ज्ञांचीही मदत घेण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. याप्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.

(Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे)

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. याखेरीज वसई-विरार महापालिकेच्यावतीनेही मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

(Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर)

Web Title: Virar Hospital Fire: Rs 5 lakh assistance from the Municipal Corporation to the families of the victims of the accident - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.