असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

By admin | Published: January 23, 2016 11:29 PM2016-01-23T23:29:37+5:302016-01-23T23:29:37+5:30

पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी

Virar station became a landmark of inconvenience | असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

Next

वसई : पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी अठरा लाखाच्या आसपास महसुल मिळतो. प्राथमिक सुविधांपासून दूर असलेल्या विरार स्टेशन परिसरात प्रवाशांना आजही रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने गेल्यावर्षभरात ७४ जणांचा जीवगेला असून ५२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
डहाणू लोकल सुुरु होण्यापूर्वी विरार रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे शेवटचे उपनगरीय स्टेशन होते. त्याचबरोबर येथून डहाणूला नियमित शटल सेवा आहे. तसेच लांबपल्लयांच्या अनेक गाड्याही विरारला थांबतात. मात्र प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विरार स्टेशनमध्ये एकूण सात फलाट आहे. त्यातील फलाट क्रमांक एक स्टेशनपासून दूर आहे. या फलाटावर पुरेसे पंखे, बसण्यासाठी बाके नाहीत. वीजेची सोय अपुरी असल्याने रात्री बऱ्यापैकी अंधार असतो. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या फलाटावर प्रवाशांचा विरोध असतानाही रात्री उशिरा लोकल येतात. त्यामुळे अंधारात पायपीट करीत स्टेशनकडे ये-जा करावी लागते. या फलाटावरून नियमित लोकल सुटत असली तरी प्रवाशांसाठी ना स्वच्छतागृह आहे ना पाणपोई.
फलाट क्रमांक दोनचीही तिच स्थिती आहे. याठिकाणी संपूर्ण फलाटावर छप्पर नाही. फलाटावर असलेले एकमेव स्वच्छतागृह पादचारी पुलासाठी तोडून टाकण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी स्वत: खर्चून बांधलेले आणि प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले गार्डन रेल्वेने पादचारी पुलासाठी तोडून टाकले. फलाट क्रमांक दोन-तीनची अवस्थाही बिकट आहे. याठिकाणी असलेली एकमेव पाणपोई पादचारी पुलासाठी तोडण्यात आली. पण, पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. या दोन फलाटांवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटतात. त्यासाठी शेकडो प्रवाशी फलाटावर असतात. पण त्यांना बसायला पुरेसे बाकडे पंखे नाहीत. फलाटावर पूर्ण छप्पर नाही. येथुन रात्री आणि पहाटे गुजरातकडे शटल सुटते. त्यासाठी बरेचसे प्रवाशी फलाटांवरच झोपत असतात. पण, विरार स्टेशनात दोन-तीन फलाटावर एकमेव स्वच्छतागृह तेही छोटेंसे आणि अतिशय घाणेरडे आहे. याठिकाणी नैसर्गिक विधीसाठी प्रवाशी अक्षरश: रांगा लावून उभे असलेले दिसतात. (प्रतिनिधी)

विरार रेल्वे स्टेशनवर एक सबवे आहे. तोही घाण आणि उग्र वास प्रवाशांना त्रस्त करीत असतो. काही अपवाद वगळता सबवे फेरीवाल्यांच्या बाजाराने भरलेला असतो. त्यानंतर एक जुना पादचारी पूल आहे. तर पुढे नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दुसरी कोणतीच सुविधा नसल्याने शेकडो प्रवाशी रुळ ओलांडून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे विरार रेल्वे परिसरात रेल्वे अपघातात ठार आणि गंभीर होण्याची संख्या सर्वाधिक आहे. गर्दी पाहता याठिकाणी तिकीट खिडक्यांची संख्या अपुरी आहे. एटीव्हीएम मशीन आहेत पण त्याही पुरेशा नसल्याने तिकीटांसाठी नेहमी मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात.

फलाट क्रमांक चार-पाच अतिशय घाणेरडे आणि उग्र वास असलेले ठिकाण. तरीही लोकल आणि शटल प्रवाशी ताटकळत उभे राहतात. पाच क्रमांकाच्या फलाटावर रात्री एक शटल उभी असते. या फलाटावर वीजेचे दिवे कमी असल्याने रात्री अंधार असतो. फलाट क्रमांक चार-पाच विरार परिसरातील बेघर, भिकारी, गर्दुल्ले यांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. हीच माणसे रात्रभर शटलमध्ये बसून नैसर्गिक विधी करीत असतात. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड घाण आणि डोके दुखवणारा उग्र वास असतो. या फलाटावर ना बाके आहेत ना पुरेसे पंखे, त्यात उग्र वासाने उठणारे डोके याही स्थितीत प्रवाशी संयम न सोडता गाडीची वाट पहात उभे असतात.

Web Title: Virar station became a landmark of inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.