विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:00 PM2019-06-04T23:00:17+5:302019-06-04T23:00:25+5:30

२५ टक्केच साठा : सूर्या-धामणी, पेल्हार व उसगाव धरणातील पाणी आटले

Virar-Vasikar's anxiety increased; The water in the three dams came back | विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

Next

आशिष राणे 

वसई : राज्य हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे ७ जून रोजी होणारे आगमन आठवडाभर लांबले असल्याने साधारण १५ जून नंतरच वरुणराजा सर्वत्र बरसेल असे चित्र आहे. मात्र या दरम्यानच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरी व ग्रामीण भागात जाणवण्याची चिन्हे आहेत.

दि. ३१ मार्च अखेरीसपर्यंत वसई-विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणात एकूण ४७.४३ टक्के असा मुबलक साठा असल्याची अधिकृत आकडेवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिल्यावर मुबलक साठा असल्याने यापुढे ही वसईत पाणीकपात होणार नाही असे ही त्यावेळी महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र आताच्या परिस्थितीत दोन महिन्यात धरणातील पाणी साठा घटल्याने ताज्या आकडेवारीनुसार वसईकरांनो पाणी जपून वापरा, असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दि.१ जूनपर्यंत धरणात सरासरी २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पालघरसहित वसई तालुक्यातील या तीन धरणांचा एकूण साठा सरासरी २५ टक्के इतका राहिला असून यामध्ये मुख्य सूर्या-धामणी धरणात आता केवळ २०.०२ टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला असून ही बाब वसईकरांच्या दृष्टीने चिंतेची आहे. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे, या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा मार्च अखेरीसपर्यंत धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंताकडून सांगण्यात आले. असले तरी आता दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा व त्याची पातळी बºयापैकी खालावली आहे.

पाऊस लांबल्यास पाणीकपात अटळ
वसई -विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा- ३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन उचलायला मिळत असते. मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई भासली होती. तशी गतवर्षी सुद्धा जुलै-२०१८ व सप्टेंबर नंतर पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. परंतु यंदा पालिकेने पाण्याचे उचित असे नियोजन केल्याने व अमृत योजना ही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने यावेळी धरणात पाण्याचा साठा अजून ही तसा समाधानकारक आहे.
याउलट बहुतांशी गंभीर स्थिती पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असून जिल्ह्यातील अनेक गावांना अजून ही पुढील १५ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर सर्वत्र मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तीन धरणातील १ जूनपर्यंत शिल्लक पाण्याची आकडेवारी
वसई- विरार शहराला मुख्य अशा सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणाच्या माध्यमाने नियमित पाणीपुरवठा होतो. त्यातच मागील वर्षीपासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद करण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फार असा फरक पडणार नाही.
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यातच आपल्या शहरी भागात पाणी पुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात आज १५ जून अखेरपर्यतही कमी का होईना मात्र अजूनही पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

Web Title: Virar-Vasikar's anxiety increased; The water in the three dams came back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी