संपातून विरारकरांची माघार
By Admin | Published: May 31, 2017 05:33 AM2017-05-31T05:33:22+5:302017-05-31T05:33:22+5:30
औषध विक्रेत्यांच्या संपातून विरारमधील विक्रेत्यांनी माघार घेत आपली दुकाने उघडी ठेवली होती. तर नालासोपारा
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : औषध विक्रेत्यांच्या संपातून विरारमधील विक्रेत्यांनी माघार घेत आपली दुकाने उघडी ठेवली होती. तर नालासोपारा आणि वसई परिसरातील काही दुकानेही सुुरु होती.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात औषध विक्रेत्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवण्याची हाक दिली होती. मात्र, केमिस्ट परिवार या संघटनेने पालघर जिल्हयात बंदला विरोध केला होता. मुख्यमंत्र्याशीं चर्चा झाल्यानंतर त्यातून तोडगा निघाला नाही तर बंद करणे योग्य होते. पण, एकतर्फी बंद आम्हाला मान्य नसल्याने आम्ही संपात सहभागी झालो नाही असे संघटनेचे अध्यक्ष दिपंकर पाटील यांनी सांगितले.
विरार शहरातील दुकाने नेहमीप्रमाणे सुरु होती. तर नालासोपारा आणि वसई परिसरात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यापरिसरातील अनेक दुकाने बंदमध्ये सहभागी झाली नव्हती.
बोईसरमध्ये कडकडीत बंद
बोईसर : आॅल इंडिया आर्गेनाईझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगीस्ट या संघटनेने मागण्यासाठी एक दिवसीय पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये बोईसरचे केमिस्ट्स असोसिएशन चे सुमारे १०५ औषध विक्रेते सहभागी होऊन बंद १०० टक्के यशस्वी केला तर रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून काही हॉस्पिटल ला जोडून असलेली मेडिकल स्टोर्स सुरु ठेवण्यात आली होती.