नालासोपाऱ्यात मतदार वाढले; तर वसईत घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 03:57 AM2018-05-25T03:57:01+5:302018-05-25T03:57:01+5:30
पालघर लोकसभा मतदारसंघ : सोपारा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ
पारोळ : पालघर लोकसभा मतदार संघात या पोटनिवडणुकित दिड लाखांनी मतदार वाढले असून आता १७ लाख २४ हजार मतदार संख्या झाली असताना मात्र या वर्षी एकट्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ८१ हजार मतदार वाढले असून ४ लाख २९ हजार मतदार संख्या असलेला पालघर जिल्हातील तो सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ ठरला तर २ लाख ७४ हजार मतदार असलेल्या वसई विधानसभा मतदार संघात मात्र ४ हजार ३०० ने मात्र मतदार घटले यामुळे नालासोपारा मतदार संघाला महत्त्व प्राप्त झाले असून तो उमेदवार विजयासाठी महत्वाचा ठरणार आहे.
नालासोपारा मतदार हा मतदार संख्येनुसार सर्वात मोठा असल्याने या मतदार संघात सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा, प्रचारसभा चालू आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांच्या ही प्रचार सभा गाजल्या तसेच या भागात कोकणी, उत्तर भारतीय,या मतदारांची संख्या मोठी आहे. पण कोकणातील मतदार गावी गेले असल्याने उत्तर भारतीय मतदाराना महत्व प्राप्त झाले असल्याने भारतीय जनता पार्टी चे उत्तर भारतीय नेते व अभिनेते या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत. तसेच या मतदार संघात विरार शहर येत असल्याने बहुजन विकास आघाडी ची मोठी या ठिकाणी ताकत असून आमदार ही याच पक्षाचा आहे. वसई विधानसभेत मतदार संख्या कमी असली तरी जाणकार मतदार या मतदात संघात आहे.
वर्किंग डे मुळे मतदानात होणार घट?
या मतदार संघात ही बहुजन विकास आघाडी चा आमदार असला तरी जन आंदोलन, भाजपा, शिवसेना,कॉग्रेस, श्रमजीवी यांचे ही मतदार या संघात आहेत. जनआंदोलन शिवसेनाच्या बाजूने तर श्रमजीवी ने भाजपा ला साथ दिली आहे. या मतदार संघात चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने व सोमवार मतदानाचा दिवस असल्याने व या संघातील मतदार मुंबईला नोकरीसाठी जात असतात. या ठिकाणी मतदान टक्का कमी होण्याची शक्यता आहे. कारण मतदानासाठीची सुटी फक्त पालघर जिल्ह्यापुरतीच मर्यादीत आहे.