वाडा कॉलेजमध्ये आले तरुणाईला उधाण
By admin | Published: January 23, 2017 05:06 AM2017-01-23T05:06:44+5:302017-01-23T05:06:44+5:30
या शहरातील कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये दोन दिवसीय उधाण यूथ फेस्टिव्हलचे आयोजन केले असून त्यात क्रीडा
वाडा : या शहरातील कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये दोन दिवसीय उधाण यूथ फेस्टिव्हलचे आयोजन केले असून त्यात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची लयलूट आहे.
वाडा तालुक्यासह शहापूर, भिवंडी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड अश्या अनेक तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या कॉलेजात विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या कॉलेजमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही उधाण २०१७ हे यूथ फेस्टिव्हल शुक्र वारपासून सुरु झाले आहे.
या कार्यक्र याच्या उदघाटन प्रसंगी खेळ हा मैदाना पुरता मर्यादित नसून तो एकमेकांत सांघिक नातं तयार करतो.खेळाने आरोग्य तर सुंदर होतेच परंतु लिंगभेद व जातीयत्येच्या भिंती नष्ट होतात, असे मतं जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आपापल्या कलागुणांना जोपासा व खूप आनंद लुटा, डोळ्यासमोर चांगल्या लोकांचा आदर्श ठेवा असा कानमंत्र युवा सामाजिक कार्यकर्त्या निशा सवरा यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुलांच्या उत्साहाला कायम उधाण येण्यासाठी असे फेस्टिव्हल साजरे होणे आवश्यक असून वाडा हा आता ग्रामीण राहिला नसून शहरी झाला आहे. सोशल मिडिया हे हत्यार असून त्याचा योग्य वापर करा, हल्ली माणसं जोडणे महत्वाचं काम असून खेळ माणसांना जोडतो असे मोलाचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांनी व्यक्त केले. वाडा गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, संदीप पवार, शरद पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने तयारी केली असून दोन दिवस विविध कार्यक्र म साजरे झाले. (वार्ताहर)