वाडा नगरपंचायत निवडणूक : पालकमंत्री सवरांसह खासदार कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणास,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:55 AM2017-12-11T05:55:50+5:302017-12-11T05:56:09+5:30

वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

 Wada Nagar Panchayat Election: The Guardian Minister, MP Kapil Patil's reputation, | वाडा नगरपंचायत निवडणूक : पालकमंत्री सवरांसह खासदार कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणास,

वाडा नगरपंचायत निवडणूक : पालकमंत्री सवरांसह खासदार कपिल पाटलांची प्रतिष्ठा पणास,

googlenewsNext

वसंत भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर जिल्हा विभाजनानंतर होत असलेल्या या नवस्थापित नगरपंचायतीच्या निवडणूकीत सवरा यांच्या सोबत खासदार कपिल पाटील यांचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे.
त्यामुळे ही निवडणूक भाजप व सवरा यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे हे सांभाळत असून सवरा विरोधात निलेश गंधे असा सामना रंगला असून दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणूकीत खुद्द सवरा यांची मुलगी उतरल्याने ही निवडणूक शहरापूरती मर्यादित न राहता जिल्हा व राज्य पातळीवर गेली आहे. याच सुमारास ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक होते आहे. त्यामध्ये आपली राजकीय उपयुक्तता व प्रभाव सिध्द करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांना या दोनही आघाडयांवर लढावे लागते आहे. या दृष्टीने ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधून घेते आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी होणाºया या निवडणूका त्यामुळेच महत्वाच्या आहेत. कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याचा फैैसला या दोन निवडणूकांतील भाजपाच्या यशाव्दारे होणार आहे.
वाडा नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे एकूण सदस्य संख्या १८ होते. या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. सर्वच्या सर्व जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित असून त्यांनी बारा जागांवर उमेदवार उभे केले असून पाच जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. राष्ट्रवादीने पाच तर बहुजन विकास आघाडीने बारा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत ही शिवसेना व भाजप यांच्यातच होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व मनसे या सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी ही ताकद भाजप, शिवसेना यांच्या पुढे जाऊ शकणार नाही. येथील काही प्रभागात तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस खाते खोलतील अशी शक्यता आहे. वाडा नगरपंचायतीची पहिल्यांदा निवडणूक होत असून वाडा शहरात तुलनेने शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्या खालोखाल भाजप आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे आठ तर भाजपाचे पाच सदस्य निवडून आले होते.
(उत्तरार्ध उद्याच्या अंकी)

मातोश्री वरून फर्मान
शिवसेनेने वाड्याची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची केली असून त्याची धुरा नेते एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यांना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक हे सहकार्य करीत आहेत. सवरा यांना या निवडणुकीत धूळ चारून भगवा फडकवा असे फर्मान मातोश्री वरून सुटल्याची चर्चा शिवसैनिकांत असून ते जोमाने कामाला लागले आहेत.

कार्यकर्त्यांचा फौजफाटा तैनात
भाजपचे तालुक्यातीलव बाहेरील कार्यकर्ते प्रचाराला जोरदार लागले आहेत. प्रत्येक महत्वाच्या पदाधिकाºयांना प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. पदाधिकाºयाने नातेसंबंध व मित्र परिवार यांना भेटून भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सवरा, गंधेंचा समान निधी
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी गेल्या वर्षी वाडा शहराच्या विकासासाठी एक कोटीचा निधी आणला होता. तर काही महिन्यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनीही विकासासाठी एक कोटीचा निधी आणला होता. मंत्र्याच्या बरोबरीने हा निधी आणल्याची चर्चा मतदारांत आहे.

झाकण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या छबीपुढे सवरा पालकमंत्री असताना आपली छबी छोटी ठेवून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची उपरोधिक चर्चा मतदार करीत आहेत.
 

Web Title:  Wada Nagar Panchayat Election: The Guardian Minister, MP Kapil Patil's reputation,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.