घराची प्रतीक्षा १९९८ पासून; पुष्पातार्इ यांच्याशी लता मंगेशकर पुरस्कारानिमित्त संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 05:46 AM2017-09-30T05:46:07+5:302017-09-30T05:46:11+5:30

‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना आपल्या सुरेल गीतांनी अजरामर करणा-या सातपाटीच्या गायिका पुष्पा पागधरे ह्यांना शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकºयां मध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Waiting for the house since 1998; Dialogues on Lata Mangeshkar award with Pushpataii | घराची प्रतीक्षा १९९८ पासून; पुष्पातार्इ यांच्याशी लता मंगेशकर पुरस्कारानिमित्त संवाद

घराची प्रतीक्षा १९९८ पासून; पुष्पातार्इ यांच्याशी लता मंगेशकर पुरस्कारानिमित्त संवाद

googlenewsNext

- हितेन नाईक ।

पालघर : ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना आपल्या सुरेल गीतांनी अजरामर करणाºया सातपाटीच्या गायिका पुष्पा पागधरे ह्यांना शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकºयां मध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला असला तरी कलाकारांच्या कोट्यातून १९९८ साली मागितलेले घर अजूनही मिळाले नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील सातपाटी गावातील गायक जनार्दन चामरे ह्यांच्या पुष्पा ताई ह्या कन्या. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच त्यांना आपल्या घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले. आवाज गोड असल्याने गायनातील बारकावे शिकावेत म्हणून त्यांना सातपाटी मत्स्यव्यवसाय माध्यमिक शाळेतील ग्राफ इन्स्ट्रक्चर शिकविणारे तसेच हार्मोनियम आणि तबल्यावर प्रभुत्व असलेल्या आर. डी. बेंद्रे सरांकडे संगीताचे धडे घेण्यासाठी दाखल केले गेले.
१९५५ च्या दरम्यान सातपाटी गावामध्ये श्रीराम प्रासादिक मंडळ, जयहिंद नाट्य मंडळ आणि न्यू उदय नाट्य मंडळ अशी तीन नाट्य मंडळ होती. ह्यातील काही नाट्य प्रयोगातील गाण्यांना त्यांनी आपला आवाज द्यायला सुरु वात केली. राम प्रासादिक मंडळातील नाट्य अभिनेते व हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रकांत सोवार पागधरे ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. खारेकुरण येथील एक आदर्श शिक्षक भिकाजी बुधाजी नाईक हे सेवानिवृत्त झाल्या प्रित्यर्थ एका कार्यक्र मात मुंबईचे तत्कालीन महापौर वासुदेव वरळीकर पाहुणे म्हणून आले असताना पुष्पा ताईने गायलेल्या ‘जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला’ हे लता दीदी च्या आवाजातील गाणे ऐकल्या नंतर ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. पुढे वसंत देसाई, राम कदम ह्या संगीतकारा पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महंमद रफी ह्यांच्या सोबत गायलेल्या ‘अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलय भारी, इत्यादी मराठी, हिंदी, भोजपुरी, बंगाली, पंजाबी, गुजराती इ.अनेक भाषांतील चित्रपटात गाणी गात सुरू राहिला. मात्र अंकुश चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर होना’ ह्या गाण्याने त्याना चित्रपट सृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख मिळवून दिली.

Web Title: Waiting for the house since 1998; Dialogues on Lata Mangeshkar award with Pushpataii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.