जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:28 AM2018-11-24T00:28:06+5:302018-11-24T00:28:36+5:30

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 Waiting for the list of drought-stricken farmers in Jawhar and Mokhad | जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

Next

- रविंद्र साळवे

मोखाडा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळामुळे मेटाकुटीला आला आहे अडिच महिने पावसाने ओढ दिल्याने जव्हार मोखाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील आणेवारी जास्त दाखवल्याने दुष्काळाच्या यादीतून ‘जव्हार-मोखाडा’ हे कुपोषणाने पीडित असलेले तालुके डावलले. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेतकºयांना आता आत्महत्या कराव्या लागणार का, असा संतप्त सवाल आता जव्हार मोखाड्यातील शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.
पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सप्टेंबर महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश उभे पीक करपून गेले. भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगांचा प्रसार होऊन भात पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाले नाही. त्यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांवर उभे भात पीक पेटवून देण्याची नामुष्की ओढवली.
यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली; परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती पावसाअभावी धोक्यात आली. त्यामुळे अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुष्काळाच्या यादीतून जव्हार मोखाडा हे तालुके वगळून सरकारने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

शेतकºयांची थट्टा
पेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १७२ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पालघर, विक्र मगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून असताना सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे जव्हार मोखाड्यातील शेतकºयांना बाधक ठरला असून पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर येथील आदिवासी शेतकरी डोळ्यात तेल घालून दुष्काळ यादीची वाट पाहत आहेत.

जव्हार मोखाड्यातील पिकांची परिस्थिती गंभीर असून दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. १५ डिसेंबरनंतर दुष्काळाची यादी प्रसिद्ध होणार असून, मंडळनिहाय दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे
-विष्णू सवरा, पालकमंत्री पालघर जिल्हा

यावर्षी कोणतेच पीक हाताला लागले नाही. आमची शेती पाण्याअभावी पूर्ण करपून गेली. त्यामुळे सरकारने आमचा तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करून मदत जाहीर करावी.
-शिवाजी गवळी, शेतकरी
धामणशेत -कोशिमशेत ग्रामपंचायत

Web Title:  Waiting for the list of drought-stricken farmers in Jawhar and Mokhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.