वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 5 जणांना अटक; वालीव पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 05:08 PM2023-01-14T17:08:30+5:302023-01-14T17:09:11+5:30

वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 5 जणांना वालीव पोलिसांनी अटक केली आहे. 

 Waliv police have arrested 5 persons for vehicle theft, forced thief, house burglary | वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 5 जणांना अटक; वालीव पोलिसांची कारवाई 

वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 5 जणांना अटक; वालीव पोलिसांची कारवाई 

googlenewsNext

(मंगेश कराळे)

नालासोपारा : वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने वाहन चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे असे ८ गुन्ह्यांची उकल करून पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ८ गुन्ह्यांची उकल करून २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वस‌ईच्या तुंगारेश्वर इंडस्ट्रियल कपंनीचे परिसरात गटारावरील ७० हजार रुपये किमतीची सात लोखंडी कव्हर्स चोरट्यांनी २८ डिसेंबरच्या रात्री चोरून नेली होती. ७ जानेवारीला वालीव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरील गुन्हयाचे अनुषगांने वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांमार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिलेखावरील आरोपी विकी नरेंद्र सिंग (२१), हेंमत रमेश मोकाशी (२५), अजित शिबु ठाकुर (३०), विघ्नेश केशव पारधी (२२) आणि मोतीम अब्दुल सज्जाक खान (२१) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. तपासादरम्यान आरोपींनी नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तसेच इतर  तपासादरम्यान आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वालीव, वनराई आणि मालाड पोलीस ठाण्याचे हददीत गुन्हे केल्याचे सांगितले. गुन्हयातील चोरीस गेलेली रिक्षा, दुचाकी, गटारावरील लोखंडी झाकण, सिलेंडर बाटले, रोख रक्कम, रिक्षाचे टायर, बॅनरच्या फ्रेम असा एकुण २ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्व्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद साबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश फडतरे, हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिश गांगुर्डे, बाळु कुटे, सचिन मोहीते, जयवंत खांडवी, सचीन खताळ या पथकाने केली आहे.


 

Web Title:  Waliv police have arrested 5 persons for vehicle theft, forced thief, house burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.