गोमघर अंगणवाडी बनली भंगार वस्तूंचे गोदाम
By admin | Published: November 7, 2015 10:16 PM2015-11-07T22:16:25+5:302015-11-07T22:16:25+5:30
तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायतअंतर्गत गोमघर येथे शासनाच्या विकास निधीतून साधारणत: ४ वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र तिचा उपयोग येथील
मोखाडा : तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायतअंतर्गत गोमघर येथे शासनाच्या विकास निधीतून साधारणत: ४ वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र तिचा उपयोग येथील ० ते ६ वयोगटांतील बालकांना होऊ शकलेला नाही. केवळ अधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही वास्तू अवघ्या दोन ते तीन वर्षांतच मोडकळीस आलेले असून लाकडी खुर्च्या, टेबल, लोखंडी कपाटे, उंदीर व घुशींचे निवासस्थान बनलेले आहे. त्याचप्रमाणे येथील लाद्यादेखील चोरीस गेलेल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे गोमघर-वासिंद ग्रामपंचायतीपासून काही सेकंदांच्या अंतरावर ही अंगणवाडीची इमारत आहे.
अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी नाइलाज म्हणून गावातील समाजमंदिरात अंगणवाडी भरवत आहेत. या गंभीर बाबीकडे तातडीने प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)