वारली भाषा, इंग्रजी वाक्य उपक्रमांना दाद, महाराष्ट्राच्या पहिल्याच शिक्षणवारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:10 AM2017-11-23T03:10:26+5:302017-11-23T03:10:28+5:30

पालघर/बोर्डी : महाराष्ट्र राज्य विद्या परिषद पुणे तर्फे शिक्षण वारी उपक्रमाचा पहिला टप्पा १७ ते १९ नोहेंबर या कालावधीत लातूर येथे पार पडला.

Warli Language, English Sentence Activities, In Maharashtra's First Education | वारली भाषा, इंग्रजी वाक्य उपक्रमांना दाद, महाराष्ट्राच्या पहिल्याच शिक्षणवारीत

वारली भाषा, इंग्रजी वाक्य उपक्रमांना दाद, महाराष्ट्राच्या पहिल्याच शिक्षणवारीत

Next

हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील
पालघर/बोर्डी : महाराष्ट्र राज्य विद्या परिषद पुणे तर्फे शिक्षण वारी उपक्रमाचा पहिला टप्पा १७ ते १९ नोहेंबर या कालावधीत लातूर येथे पार पडला. त्यात पालघर जिल्ह्यातून वारली भाषेतील शिक्षण साहित्य आणि १७० शब्दांपासून ५० लाख इंग्रजी वाक्ये या दोन्ही उपक्र मांनी दाद मिळविली.
येथे राज्यातील ५४ उपक्रमशील शिक्षक व संस्थाचे स्टॉल मांडण्यात आले होते. त्या मध्ये पालघर जिल्ह्यातील तीन स्टॉल होते. डहाणू तालुक्यातील के. एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बी. आर. चव्हाण यांनी १७० शब्दापासून ५० लाख इंग्रजी वाक्ये तयार करणे हा उपक्र म सादर केला. तर पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद खोरीचापाडा शाळेतील शिक्षक राजन गरुड यांनी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे या विषयांतर्गत आदिवासी वारली बोलीभाषेतून अध्ययन साहित्य निर्मिती हा उपक्र म मांडला. या उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक केले. या पुढील दुसरा टप्पा अमरावती येथे १५ ते १८ डिसेंबरला, तिसरा टप्पा रत्नागिरी येथे ११ ते १२ जानेवारी आणि चौथा टप्पा २९ ते ३१ जानेवारी दरम्यान नाशिक येथे आहे.
पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोरीचापाडा केंद्र पारगाव येथील शिक्षक राजन गौतम गरुड यांनी आदिवासी वारली बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. त्यांनी प्रथम वारली या बोलीभाषेत इयत्ता पहिलीचे संपूर्ण पाठयपुस्तक अनुवादित केले. त्या मध्ये विविध गोष्टी, कथा, चित्रकथा, २५० शब्दसंग्रह, कविता यांचा समावेश आहे.
>विक्रमाची झाली गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये नोंद
डहाणूतील के.एल.पोंदा हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक बी.आर.चव्हाण यांनी सेंटेन्स बँक हे १७० शब्दापासून तब्बल ५० लाख इंग्रजी वाक्ये तयार करता येतील असे स्वयं अध्ययन शैक्षणिक साधन तयार केले आहे. याच सेंटेन्स बँकचा प्रत्यक्षात वापर करु न तब्बल पन्नास लाख अर्थपूर्ण आणि व्याकरणदृष्टया अचूक इंग्रजी वाक्ये तयार करण्याचा नवीन जागतिक विक्र म केला आहे. या नवीन जागतिक विक्र माची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

Web Title: Warli Language, English Sentence Activities, In Maharashtra's First Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.