रस्ता-दुभाजकांवर साकारली वारली चित्रकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:16 PM2019-12-29T23:16:49+5:302019-12-29T23:16:56+5:30

वसईच्या स्टेला येथील अनोखा प्रकार; महापालिका क्षेत्रातील अन्य रस्त्यांवरही चित्रे काढण्याची मागणी

Warli painting on road-divider | रस्ता-दुभाजकांवर साकारली वारली चित्रकला

रस्ता-दुभाजकांवर साकारली वारली चित्रकला

googlenewsNext

- आशीष राणे

वसई : ‘स्वच्छ वसई हरित वसई’ या संदेशाने गाजत असलेल्या वसईमधील नवघर-माणिकपूर शहरातील स्टेला-भाबोळा येथील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर ‘वारली संस्कृती’ची कलाकुसर साकारल्यामुळे हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने या ठिकाणी अत्यंत आकर्षक, सुबक व लक्षवेधी ठरणारे ‘वारली संस्कृती’चे हे चित्र रेखाटल्यामुळे हा प्रयत्न शहरातील स्वच्छता राखण्यासाठी केलेला एक कल्पक प्रयोग ठरला असल्याचे मत येथील स्थानिक नागरिक व वसईतील उद्योजक आशीष धुरी यांनी ‘लोकमत’ला दिली. निदान गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्याने रंगणाºया अशा दुभाजकांची या कलेच्या माध्यमातून तरी तूर्तास सुटका झाली आहे, असे ते म्हणाले.

दुभाजकांवरील कलेचा आधार घेत वसई-विरारमधील सर्वच मुख्य रस्त्यांच्या दुभाजकाची व्याप्ती तथा लांबी व रुंदी वाढवून त्यावर अशी कलाकुसर रेखाटण्याची मागणीही आता यानिमित्ताने नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, रस्ते दुभाजकांची दयनीय अवस्था, धोकादायक स्थितीतील दुभाजक अशा नानाविध मुद्यांवर वाहनचालक व प्रवाशांकडून नेहमीच महापालिका प्रशासनावर बोचरी टीका केली जात असते. त्यामुळे दुभाजकांना वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि त्याचा श्रीगणेशा वसई-विरार महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीकडून करण्यात आला. येथील स्टेला-भाबोळा रस्ता दुभाजकाची उंची वाढवून त्यावर चक्क वारली संस्कृतीच्या चित्रकलेची कलाकुसर करण्यात आली.

या सुंदर, सुबक आणि आकर्षक कलाकुसरीमुळे येथील रस्ता दुभाजक लक्षवेधी ठरला असून रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी काही काळ थांबून या दुभाजकावरील वारली कलाकुसर मोठा जिज्ञासेने न्याहाळत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीच्या हद्दीत येणाºया भाबोळा येथील साईबाबा मंदिरालगत असलेला हा दुभाजक दोन्ही बाजूंनी लाल व पांढºया रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर पांढºया रंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेली वारली चित्रकला साकारण्यात आली आहे.

विद्रूपीकरण थांबेल?
गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगणारा हा ६० ते ७० फुटांचा दुभाजक वारली चित्रकलेमुळे लक्षवेधी ठरला असून ही रंगरंगोटी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. या आकर्षक चित्रांमुळे किमान आता तरी हे दुभाजक कोणी अस्वच्छ करणार नाही, असे नवघर-माणिकपूर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Warli painting on road-divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.