विरारच्या हार्दिकचे आयर्न मॅन स्पर्धेत यश, मेक्सिकोमध्ये फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:41 AM2017-12-01T06:41:24+5:302017-12-01T06:41:55+5:30
आयर्नमॅन असा लौकिक असलेल्या दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको येथील कोंझुमेल येथील स्पर्धेत विरारच्या हार्दिक पाटीलने तिरंगा फडकवला.
वसई : उल्लेखनिय बाब म्हणजे या स्पर्धेत खेळणारा हार्दिक हा एकमेक भारतीय स्पर्धक होता. स्पर्धेत १ हजार १८४ स्पर्धक सहभागी झाले होते.
३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरुप होते. ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करण्याचे बंधन होते. हार्दिकने ही आयर्नमॅन स्पर्धा १६ तास ३६ मिनिटात पूर्ण केली. हार्दिकने ही चौथी पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. देश विदेशात याआधी तीन वेळा पूर्ण आयर्नमॅन, १० हून अधिक अर्ध आयर्नमॅन व १५ हून अधिक ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये प्रत्येक टप््याचे वेगळे आव्हान असते. ती तीन वेळा पार करावी लागतात असे पाटील म्हणाले.
कशी असते ही स्पर्धा!
द आयर्नमॅन ट्रायथलॉन ही स्पर्धा म्हणजे वेगवेगळ््या प्रकारच्या तीन छोट्या मॅरेथॉन असतात. जागतिक ट्रायथलॉन कॉर्पोरेशन मार्फत ही स्पर्धा आयोजित केली जाते. ३ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारात ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. कुठेही न थांबता १७ तासांच्या आत सव्वादोनशेहून अधिक किलोमीटर लांबीचा पल्ला स्पर्धकांना पार करावा लागतो. १७ तासांहून अधिक वेळ घेणारा स्पर्धक बाद समजला जातो. स्पर्धेचा पहिला टप्पा २ तास २० मिनिटात पूर्ण करावा लागतो. त्यापुढचा सायकलिंगचा टप्पा ८ तास १० मिनिटात तर अखेरच्या टप्यात साडेसहा तास धावून रात्री बारा वाजण्याच्या आता फिनिशिंग लाईनला टच करावे लागते. शारिरिक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेचाही कस लावणाºया या स्पर्धेचा विजेता आयर्न मॅन म्हणून सन्मानित केला जातो.
नॅशनल शॉटगन चॅम्पियन स्पर्धेत पूजा पाटीलने पटकावले कांस्यपदक
पालघर : दिल्ली येथे झालेल्या नॅशनल शॉटगन चॅम्पियन स्पर्धेत पालघरच्या पूजा समीर पाटील हिने कांस्य पदक मिळवून जिल्ह्याची शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दुर्दम्य इच्छाशक्ती मनात असेल तर कुठलेही ध्येय साध्य करता येते हे पूजा हिने सिद्ध केले आहे. सध्या ती मुंबईच्या डॉ.बळीराम हिरे आर्किटेक्चर विद्यालयात वास्तू विशारद (आर्किटेक्चर) च्या तिसºया वर्गात शिक्षण घेत आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये जयपूर येथे झालेल्या ६० व्या राष्ट्रीय नेमबाजीच्या ज्युनिअर महिला डबल ट्रॅप स्पर्धेत (शॉटगन) प्रथम रौप्य पदक तर सिनिअर गटात कांस्य पदक मिळविले होते. मार्च २०१७ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया जी.वि.मालवणकर स्पर्धेतील ३०० मीटर बिग बोअर स्पर्धेतील ज्युनिअर व सिनिअर गटात रौप्यपदक मिळविले. आॅक्टोबर २०१७ मध्ये पुणे येथे झालेल्याडबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते.