भाजपाकडून तरुणाची धुलाई
By admin | Published: October 10, 2016 03:07 AM2016-10-10T03:07:59+5:302016-10-10T03:07:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी
मीरा रोड : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम याला विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कलाम याने केली आहे. पोलिसांनी अद्याप मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
भार्इंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगरमध्ये रामाग्या यादव यांची खोली असून त्यांनी ती गेल्या दोन वर्षांपासून मोबिन अहमद यास भाड्याने दिली आहे. स्टील कारखान्यात काम करणारा मोबिन हा आपल्या अन्य तिघा सहकाऱ्यांसह राहतो. मोबिन याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विडंबनात्मक छायाचित्रे टाकल्याने भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोबिनला मारण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून तो राहत असलेल्या घरात शिरले. त्यावेळी मोबिन त्यांना सापडला नाही. मात्र, मोबिनसोबत राहणारा अब्दुल कलाम याला त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या धटिंगणशाहीची दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी कलाम याला पोलीस ठाण्यात आणून चौकशीसाठी बसवून ठेवले. (प्रतिनिधी)
आपण काही केलेले नाही. फेसबुकवर कुणी काय पोस्ट टाकली, तेही आपल्याला माहीत नाही. अचानक रात्री गुंड घरात शिरले व मारहाण करू लागले. पोलिसांनी मला मारहाण झाल्याची ना तक्रार घेतली, ना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली. - अब्दुल कलाम
आम्ही कुणालाही मारहाण केलेली नाही. अन्य कुणी लोकांनी मारहाण केली असेल. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता खोली भाड्याने देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
-विनोद शिंदे, सचिव,
भाजपा युवा मोर्चा फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मोबिनचा आम्ही शोध घेत आहोत. याबाबत, तक्रार आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तक्रारी व घडलेला प्रकार सरकारी वकिलांकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठवला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यावर पुढील कारवाई केली
-अनिल कदम, वरिष्ठ निरीक्षक