वनविभागाची रोपे वाचविण्यासाठी पाण्याच्या बाटलीने ठिबक सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:52 PM2019-02-27T23:52:51+5:302019-02-27T23:52:55+5:30

टाकाऊतून असेही टिकाऊ : लोकसहभागातून वृक्षांना थेंब थेंब पाणी

Water bottle drip irrigation to save forest seedlings | वनविभागाची रोपे वाचविण्यासाठी पाण्याच्या बाटलीने ठिबक सिंचन

वनविभागाची रोपे वाचविण्यासाठी पाण्याच्या बाटलीने ठिबक सिंचन

- रविंद्र साळवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा : यंदा पावसाने लवकर पाठ फिरवल्याने तालुक्यात पाणी टंचाई ची दाहकता डिसेंबर महिन्या अखेरीस निर्माण झालेली असून माणसान प्रमाणे रोपवनातील झाडांना देखील पाणी टंचाई ची झळ बसणार हे मात्र नक्की आहे.

फेब्रुवारी ते मे महिन्यातील सूर्याच्या अति उष्णतेने वन विभागातील नवीन लागवड केलेली झाडांची रोपे नष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे या झाडांना वाचविण्यासाठी मोखाडा वनविभागातील पोशेरा परिमंडळचे वनपाल कर्डीले जी.एस यांच्या संकल्पनेतून या रोप वनातील झाडांना वाचविण्यासाठी नामी शक्कल लढविण्यात आली. यासाठी खोच ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांनी त्यांना पुरेपूर सहकार्य केले. वतवड्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खोच या गावा नजीक मोखाडा वन विभागाचे कंपाऊंड मधील दहा हेक्टर क्षेत्रावर दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस लवकर गायब झाल्याने ही रोपे मुबलक पाण्याअभावी नष्ट होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे वनपाल कर्डीले यांच्या संकल्पनेतून या वृक्षाना जीवदान देण्यासाठी रिकाम्या बिस्लरी बॉटल जमा करु न या बाटलीच्या झाकणास छिद्र पाडण्यात आले व बाटलीच्या तळापासून ते झाकणाच्या छिद्रातून सुतळी दोरा टाकण्यात आला व बाटली पाण्याने पुर्ण भरली त्यानंतर या सर्व बिस्लरी बाटल्या प्रत्येक रोपांच्या खोडा जवळ आडवी ठेवून त्या बाटली तील पाणी थेंब थेंब भर तीन ते चार दिवस झाडांच्या खोडावर पडुन त्या ठिकाणी ओलावा निर्माण करून झाडाला संजीवनी दिली गेली.

Web Title: Water bottle drip irrigation to save forest seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.