कोका-कोलाच्या सांडपाण्याने पाणी दूषित
By admin | Published: January 10, 2017 04:47 AM2017-01-10T04:47:12+5:302017-01-10T04:47:54+5:30
कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील
वाडा : कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आजारात वाढ झाली असून आरोग्य धोक्यात आले आहे. हेच पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत गेल्याने कडधान्याचे पीकदेखील धोक्यात आले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
या कंपनीला दररोज लाखो लीटर्स पाणी लागते. हे पाणी कंपनीत असलेल्या शेकडो बोअरवेल व वैतरणा नदीवर सिंचनासाठी बांधलेल्या १९८ मीटर लांबीच्या बंधाऱ्यातून कंपनी नामपात्र पाणीपट्टी देऊन उचलते. तालुक्यात मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवते. या कंपनीने तयार केलेले मुदतबाह्य पेय मार्केटमधून परत आले. ते दूषित झाल्याने कंपनीने गटारातून नाल्यात व शेतात सोडले आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी लालसर होऊन दूषित झाले आहे. (प्रतिनिधी)