पाणीबाणीचे संकट : पालघर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:41 PM2019-06-25T23:41:39+5:302019-06-25T23:42:35+5:30

पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Water crisis crisis: Palghar bastion near the base | पाणीबाणीचे संकट : पालघर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

पाणीबाणीचे संकट : पालघर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

Next

पालघर  - पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील धरणात एक महिनाभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी हा पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास जिल्ह्यात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊन मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात सूर्या मोठा प्रकल्प, मोहखुर्द लघु पाटबंधारे योजना, खांड लघु पाटबंधारे योजना, पालघर तालुक्यात वांद्री मध्यम प्रकल्प मनोर लघु पाटबंधारे योजना, देवखोप लघु पाटबंधारे योजना, माहीम- केळवा लघु पाटबंधारे योजना तर डहाणू तालुक्यात रायतळे लघु पाटबंधारे योजना अशा ८ प्रकल्पांतर्गत प्रकल्पिय पिण्याचा पाणीसाठा, सिंचनक्षमता जिल्ह्यासाठी कार्यान्वित आहे. यातील सूर्या मोठा प्रकल्प, माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजना व खांड लघुपाटबंधारे योजनेतून जिल्ह्यातील काही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

जिल्ह्यात सूर्य मोठा प्रकल्प हा विक्र मगड तालुक्यात असून त्याची उपयुक्त क्षमता २८६.३१० दलघमी इतकी असून मृत पाणीसाठा (वापरात नसलेला) १२.७०० दलघमी असा एकूण २९९.०१० दलघमी अशी क्षमता आहे. २३ जून २०१९ पर्यंत यात ५२.०१५ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी १८.८४ टक्के इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ४४.५२ दलघमी इतका कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पांतर्गत वसई, विरार, टीएपीएस, बीएआरसी, बाडा पोखरण डहाणू, पालघर २७ गावे आदींना पाणीपुरवठा केला जात असून त्यांची दररोज सुमारे ०.२० दलघमी एवढी पाण्याची मागणी आहे. मात्र या प्रकल्पातून सिंचनासाठीही पाणी दिले जात असल्याने त्यांची संपूर्ण मागणी पूर्ण करता येत नाही.
माहीम केळवा लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत धरणातून पालघर तालुक्यातील केळवे रोड, आगरवाडी, नगावे, विळगी वेंगनी, तिघरे, दांडा -खटाळी, भादवे, मथाने, एडवन, कोरे, खर्डी, दातिवरे आदी भागात पाणीपुरवठा केला जात असून या प्रकल्पाची वापरता येण्याजोगा पाणीसाठा क्षमता ३.२४३ दलघमी इतका असून वापरता न येण्या जोगा (मृत) पाणीसाठा ०.१५६ दलघमी असा एकूण ३.३९९ दलघमी इतका पाणीसाठा क्षमता आहे. सोमवारी (२३ जून)पर्यंत या धरणात ०.९३४ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षाच्या तुलनेने ०.१८६ इतका कमी आहे. तरीही एक महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर.आर.पाध्ये यांनी सांगितले. खांड लघु पाटबंधारे योजनेतर्गत विक्र मगड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून या धरणाची क्षमता ४.५०० दलघमी इतकी आहे. यातील वापरता न येण्याजोगा मृत पाणीसाठा ०.२६० दलघमी इतका असून एकूण ४.७६० दलघमी इतकी साठवणूक क्षमता आहे. या धरणात सध्या ०.४०८ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.०४४ दलघमी इतका अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.

तरच जव्हारला प्यायला पाणी
जव्हारला जयसागर डॅममधून पाणीपुरवठा केला जात असून यामधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने जव्हारकरांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. त्यांची सारी भिस्त पावसावर अवलंबून असल्याने त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Web Title: Water crisis crisis: Palghar bastion near the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.