डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 11:32 PM2019-11-07T23:32:25+5:302019-11-07T23:32:42+5:30

मदत तरी कुणाची घेणार : घरासाठी पौष्टिक धान्य मिळणार नाही

Water in the eyes and in the fields, will help someone | डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

Next

भातसानगर : हातचे भातपीक पावसाने नेले, आता मदत तरी कुणाची घेऊ, अशी अवस्था शहापूर तालुक्यातील कानवे येथील हुसेन आदम शेख या शेतकऱ्याची झाली आहे. या शेतकºयाची पूर्ण भातशेती आज पाण्यात गेली आहे. त्यामुळे आता वर्षभरासाठी ठेवले जाणारे घरचे पौष्टिक धान्य मिळणार नसल्याचे दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.

कानवे येथे राहणाºया या शेतकºयाच्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारचे संकट कधीच आले नाही. केवळ, पावसाच्या पाण्यावर वर्षभरातून एकदाच भातपीक घेतले जाते. याच एकमेव पिकावर त्यांचे वर्ष अवलंबून असते. या दोन एकर चार गुंठे शेतीत ४० ते ५० पोती भात पिकेल. त्यापैकी निम्मा भात बाजारात विकायचा. या विकल्या गेलेल्या भातपिकातून मिळणारे पैसे आपल्या कुटुंबासाठी ठेवायचे. उर्वरित धान्य आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल, या अंदाजाने ते घरात ठेवायचे, हा त्यांचा दरवर्षाचा नित्यक्र म आहे. या वर्षी मात्र हे सारे अंदाज पावसाने धुळीस मिळाल्याने वर्षभर त्यांना बाजारातून धान्य विकत घ्यावे लागणार तर आहेच, पण त्या धान्यामध्ये ती पौष्टिकता मिळणार नसल्याची खंत त्यांच्या जिव्हारी लागली आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, त्यामुळे दर्जेदार तांदळाचे दाणे त्यांना खायला मिळत होते. मात्र, यावर्षी या तांदळाला त्यांना मुकावे लागणार आहे. कधी नव्हे ती स्थिती आज या कुटुंबाची झाली आहे. आज लावलेली भातशेती, बहरलेली भातपिके तुडुंब भरलेल्या शेतातील पाण्यात बुडाल्याची स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

वर्षभर तांदळाची समस्या भेडसावणार

चार मुले, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दुसरा व्यवसाय नसल्याने त्यांच्यासाठी पाण्यात गेलेले भातपीक हे फार मोठे संकट असल्याने त्यांच्यासाठी आता वर्षभर तांदळाची समस्या निर्माण होणार आहे. केवळ याच पिकावर त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालत असल्याने आता पुढे कसे होणार, हा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

Web Title: Water in the eyes and in the fields, will help someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.