वॉटर फिल्टर खरेदीत घोटाळा?, मनसेची बीडीओकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:33 PM2017-12-24T23:33:02+5:302017-12-24T23:33:22+5:30
बाल विकास प्रकल्प, पालघर प्रशासनाकडून पंचायत फंड (सेस) योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला
पालघर : बाल विकास प्रकल्प, पालघर प्रशासनाकडून पंचायत फंड (सेस) योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला असून यासंबंधात मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालघरच्या गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन या व्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून कारण्यात आली आहे.
पालघर पंचायत समतिीच्या फंड(सेस) अंतर्गत पालघर तालुक्यातील सर्व अंगणवाडयÞाना पुरविण्यात आलेले वॉटर फिल्टर हे निकृष्ट दर्जाचे व अवाजवी किमतीचे असून पाणी शुद्धीकरण प्रक्रि या चांगल्या दर्जाची नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असल्याच्या तक्र ारी होत्या. त्या अनुषंगाने या वॉटर फिल्टरची पाहणी केली असता, हे वॉटर फिल्टर निकृष्ट दर्जाचे असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार बाल विकास प्रकल्पाच्या प्रशासनाकडून घडला असून, शासनाची खरेदी नियमावली जाणीवपूर्वक डावलून वॉटर फिल्टर खरेदी व्यवहार केला असल्याचा आरोप मनसेने दिलेल्या पत्रात केला आहे.
या प्रकरणातील गांभीर्य पाहून सहाय्यक गटविकास अधिकारी आण िविस्तार अधिकारी या अधिकार्यांची समतिी नेमून यासंबंधात चौकशी करण्यात येईल असे पालघरचे गट विकास अधिकारी यांनी मनसेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले व तसे पत्रही मनसे शिष्टमंडळाला यावेळी दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, माजी तालुका उपाध्यक्ष प्रविण किणी, धिरज गावड मनविसे उपजिल्हा अध्यक्ष, विजय काचरे, रत्नदीप पाखरे, हेमंत घोडके, धनंजय झुंजारराव मनविसे उपशहर अध्यक्ष, मनोज पामाळे, नयन पाटील आदी उपस्थित होते.