मोखाड्यात पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:21 AM2020-03-18T00:21:51+5:302020-03-18T00:22:24+5:30

मोखाडा तालुक्यातील ४ गावे आणि ११ पाड्यांना सहा टँकरने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

Water scarcity in mokhada | मोखाड्यात पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू!

मोखाड्यात पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू!

googlenewsNext

- रवींद्र साळवे
मोखाडा : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था असलेल्या मोखाडा तालुक्यात लहान-मोठी पाच धरणे असतानाही पाणीटंचाईचा वैशाख वणवा सुरू झाला आहे. तालुक्यातील ४ गावे आणि ११ पाड्यांना सहा टँकरने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणारे दोन महिने उष्णतेचे असल्याने भविष्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने नागरिक चिंता व्यक्त करू लागले आहेत.
तालुक्यातील पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघुपाटबंधारे, नळपाणीपुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च वर्षनिहाय केला जात असतानाही पाणीटंचाई का? यंदा उशिरा का होईना ४ गावे आणि ११ पाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी जवळपास टंचाईग्रस्त गाव-पाड्यांनी शंभरी गाठली होती.
नगरपंचायतीच्या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसह ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा पावसाने उशिरापर्यत जरी मुक्काम ठोकला असला तरी उशिरा का होईना पण तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर करायला सुरुवात केलेली आहे. टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिलेले असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय नुकताच टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना येऊन गेला. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघुपाटबंधारे, वन विभागाचे बंधारे, नळपाणीपुरवठा योजना, सिंचन विहिरी आदीसह कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे.

महिलांची पायपीट सुरू

मार्चच्या सुरुवातीलाच पाणी-टंचाईची भीषणता जाणवत असून महिलांची मैलो-न्-मैल पायपीट सुरू झाली आहे.
तालुक्यात पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले आहेत. मात्र याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तर आजही प्रशासनाकडे नाही.

Web Title: Water scarcity in mokhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.