मोखाडा तालुक्यातील ८२ गावपाड्यांत पाणीबाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:53 AM2018-05-14T04:53:20+5:302018-05-14T04:53:20+5:30

तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सा

Water supply in 82 villages of Mokhada taluka ..! | मोखाडा तालुक्यातील ८२ गावपाड्यांत पाणीबाणी..!

मोखाडा तालुक्यातील ८२ गावपाड्यांत पाणीबाणी..!

googlenewsNext

रविंद्र साळवे 
मोखाडा : तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सायदे, हटीपाडा, चास, ठाकुरपाडा बिवलपाडा, अशा २४ गावे आणि ५८ आदिवासी गावपाड्यांची तहान भागवली जात आहे.
त्याचबरोबर उन्हाची तीव्रता दिवसा गणिक वाढत असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.
१५७ पाडे व ५९ महसूल गावे असलेल्या मोखाडा तालुक्यात निम्यापेक्षा अधिक गाव-पाड्यांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो डिसेंबर पासून च येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू होते असते तर सध्या तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातील विहीरी कोरड्याठाक पडल्याने घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
परंतु यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडोच्या योजना राबविण्यात आल्या जलराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगारासाठी हमी योजने अंतर्गत विहिरी बांधणे, परंतु याचा जनतेला फायदा कमी आणि भ्रष्टाचारच जास्त झाला.

Web Title: Water supply in 82 villages of Mokhada taluka ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.