डिझेलअभावी पाणी टँकर ठप्प!

By admin | Published: March 19, 2017 05:34 AM2017-03-19T05:34:15+5:302017-03-19T05:34:15+5:30

दरवर्षी प्रमाणे यंदाही भीषण पाणी टंचाईत मोखाडा तालुका होरपळत आहे जानेवारी पासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या

Water tanker jam due to diesel! | डिझेलअभावी पाणी टँकर ठप्प!

डिझेलअभावी पाणी टँकर ठप्प!

Next

- रविंद्र साळवे, मोखाडा
दरवर्षी प्रमाणे यंदाही भीषण पाणी टंचाईत मोखाडा तालुका होरपळत आहे जानेवारी पासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या २९ प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन मोखाडा विभागाला १९ टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी दिले असले तरी डिझेलअभावी हे टँकर जव्हार फाटा येथे उभे करून ठेवावे लागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे डिझेलसाठीचे अनुदान वर्ग केले आहे परंतु तिने ते तालुक्यांना पाठविले नसल्याने टँकर उभे करून ठेवण्याची वेळ आलीे असून संताप व्यक्त केला जात आहे. एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षे नंतर कसेबसे टँकर पुरवण्यात आले परंतु डिझेलसाठी अनुदानाची तरतूद केली नसल्याने कुणी डिजेल देता का डिझेल असा टाहो फोडण्याची वेळ पाणीटंचाईग्रस्त आदिवासी बांधवांवर आली आहे.
टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या दिवसा गणिक वाढत असून प्रशासनाच्या या हलगर्जी कारभारामुळे पाण्यासाठी कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी लोकमतशी बोलतांना केला आहे.

Web Title: Water tanker jam due to diesel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.