वसई पश्चिम पट्ट्यातील पाण्याची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:58 AM2017-12-27T02:58:22+5:302017-12-27T02:58:24+5:30

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे.

Water will be inspected in Vasai West belt | वसई पश्चिम पट्ट्यातील पाण्याची तपासणी होणार

वसई पश्चिम पट्ट्यातील पाण्याची तपासणी होणार

Next

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावक-यांमध्ये घातक रोगांची लागण होऊ लागली आहे. ती रोखण्यासाठी येथील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानंतर हे पाणी पिण्यालायक आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
वसईच्या पश्चिम पट्ट्यात विहीरी आणि बोअरवेल हाच पेयजलाचा स्त्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरने पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाण्यात क्षार, क्लोराईडचे प्रमाण अधिक असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जल तज्ञांनी काढला आहे.
नंदाखाल, निर्मळ, गास, भुईगाव या गावातील पाण्यात क्षाराचे प्रमाण ७०० पासून १५० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. यामुळे मूत्रपिंडासह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर दुष्परिणाम होतात. या पाण्याचा सामू (पीएच) ८ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९. पर्यंत आहे. याचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो. त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो, असा तज्ञांचा दावा आहे. इतकेच नाही तर पाण्यात जंतू, माती व रसायनांचेही प्रमाण असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
पश्चिम पट्ट्यातील अनेक गावातील पाण्यात क्लोराईडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक आहे. मात्र, बोळींज, नंदाखाल, भुईगावया ठिकाणी क्लोराईडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळले आहे. अति उपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे. आगाशी, नंदाखाल, बोळींज या परिसरात नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत पोचले आहे. हा घटक जास्त असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते. वसई तालुक्यात ३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी पश्चिम पट्ट्यात ११ ग्रामपंचायती आहेत. याठिकाणी ५० सार्वजनिक विहीरी, चार नळ पाणी पुरवठा योजना व ५११ बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या सर्व जलस्त्रोताचे नमुने तपासले जाणार आहेत.
>विधान परिषदेत उपस्थित झाला प्रश्न
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आमदार आनंद ठाकूर व हेमंत टकले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या उत्तरात या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती दिली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर पाणी पुरवठा संबंधी ठोस कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Water will be inspected in Vasai West belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.