डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:35 AM2019-05-16T00:35:47+5:302019-05-16T00:36:22+5:30

डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे.

Waterfall in Saiwan area of Dahanu; Wells and rivers | डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

Next

कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोकळ आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी पाणीसमस्ये कडे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा प्रश्न न सोडविणारे प्रशासन केवळ निवेदने फक्त स्विकारते का ? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सायवन, दाभाडी किन्हवली, सुकटआंबा, दिवशी, शिसने, ओसरविरा, धानिवरी या आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक गावपाड्यांत यावर्षी जलसंकट उभे ठाकले आहे. सायवन ग्रामपंचायतिच्या आजूबाजूच्या सुमारे २० गावापड्यात हे संकट अधिकच तीव्र झाले आहे. त्याचा फटका सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीला बसणार आहे. दाभाडीमधील भावरपडा, फणसोन पाडा, बोरीपाडा, धुळशेत पाडा येथे पाणीटंचाई आहे त्यापैकी भावरपाडा गावातील सुमारे ४५० लोकवस्ती असलेल्या पाड्यातील लोकांना नदीपात्रात खड्डे खोदून पाणी भरावे लागत आहे . सुकट आंबा गावातील बरडीपाडा, पाटीलपाडा, जुणूनपाडा, शिरशेनपाडा तर दिवशीगावातील चामलपाडा, गडदपाडा, चिंचपडा येथील पाड्यामधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाणी पातळी दीड महिने अगोदरच खालावल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून नदी पात्रात लहानसा पोहरा खोदून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दूरवरून पाणी आणताना माता भगिनींना दररोज बहुतेक वेळ पाण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंती करण्याची कसरत करावी लागते.

सायवन परिसरातील पाणीप्रश्नावर डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून टँकरने पाणीपुरवठा करावा. आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव आहे. शासनाने त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरु करु न लोकांची तहान भागवावी.
- महेंद्र खांडवी, ग्रामपंचायत सदस्य

आम्हाला मागील दीड महिन्यापासून पाणी मिळत नाही. नदी लवकर आटल्याने पोहरा खोदूनही जेमतेम पिण्याइतके पाणी मिळते. आमच्या गावासाठी सरकारने पाण्याची सोय करावी.
- जया मेढा, महिला ग्रामस्थ, सायवन

Web Title: Waterfall in Saiwan area of Dahanu; Wells and rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी