धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:57 AM2018-04-22T04:57:07+5:302018-04-22T04:57:07+5:30

पंधरा-वीस दिवसांआड पुरवठा : जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याने भागते तहान

Waterfall in the younger Dahanu | धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

googlenewsNext

शौकत शेख।
डहाणू : सूर्या प्रकल्पाअंतर्गत येणाºया धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणूवासीयांना जिल्हा परिषदेच्या पाणीपूरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ, पंधरा, तसेच वीस दिवसांआड पाणीपूरवठा होत असल्याने हजारो भूमिपुत्रांना साठवून ठेवलेले गढूळ तसेच दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पंचायत समिती सदस्य वशीदस अंभिरे तसेच धा. डहाणूचे माजी सरपंच हरेश्वर तामोरे यांनी लोकमतला सांगितले.
डहाणूच्या पश्चिम किनापट्टीवरील २६ गावांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपूरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणांतून पाणी पूरवठा केला जातो. परंतु या योजनेला वीस, पंचवीस वर्ष झाल्याने त्याची जलवाहिनी, जलकुंभ, जिर्ण व जूनाट झाल्याने शासनाने बाडापोखरण पाणी पूरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी ४३ कोटी रूपये अनुदान मंजुर करून मार्च २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली होती. परंतु अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने सध्या जुन्याच जलवाहिनेने पाणी पूरवठा होत आहे. या प्रकारामुळे असंख्य गावांत तसेच खेडोपाडयात प्र्रेशरने पाणी जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पूरेश प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय अनेक गावांत आठ, दहा दिवसाने पाणी पूरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विहिर किंवा बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या रेल्वेच्या पूर्व भागामध्ये मोठया प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली गावे आहेत. येथील असणाºया धरणांच्या उभारणीसाठी शासनाने आदिवासी उप योजनेतून ४८० कोटी खर्च केले आहेत. त्यातून वसई-विरार, भार्इंदर आदी शहरी भागाची तहाण भागविली जात असतांना येथील स्थानिक आदिवासी बांधव तहाणेणे व्याकुळ होत आहे.
येथील गोर गरीब आदिवासींना या धरणातील नळापणीपूरवठा योजनेव्दारे किंवा इतर मार्गाने पिण्याच्या पाण्याच्या थेंब ही मिळत नाही. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अशीच आहे. येथे दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्योन ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर बाडा पोखरण योजनेचे शेवटचे गाव असलेले धा. उहाणूच्या रामपाडा, बारीवाडा, आदिवासीपाडा, माळी आळी, मधली आळी, मितनवाडी, हनुमान आळी या परिसरातील ग्रास्थांना वीस दिवसाने पाणी पूरवठा होत असल्याने ग्रामस्थ वीस दिवस साठवून ठेवलेले दुषीत, शिळे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

थेंबेथेंबे घागर भरे
पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा डबक्यातील गढूळ दुषित पाणी प्यावे लागत आहे. तर वाणगांव पासून थेट धरणापर्यंत राहणाºया आदिवासींना मोठ मोठ्या शहरांना, तारापूर अणुशक्ती केंद्र, एम.आय.डी.सी. रिलायन्स एनर्जी सारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाकडे जाणाºया जलवाहिनीतून थेंब-थेंब झिरपणाºया पाणवर ताहान भागवावी लागत आहे.

Web Title: Waterfall in the younger Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण