आम्ही घडलो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या तळमळीमुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 02:18 AM2020-09-05T02:18:14+5:302020-09-05T02:18:36+5:30

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते.

We happened because of the teacher's thirst for knowledge! | आम्ही घडलो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या तळमळीमुळे !

आम्ही घडलो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या तळमळीमुळे !

Next

- हितेन नाईक
पालघर : सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जि.प.च्या शाळेत शिकलेल्या आणि उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या डॉ. किरण महाजन यांनी आपली यशोगाथा उलगडताना आपल्या आयुष्यात शिक्षकांचे असलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे विशद केले आहे...

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते. - डॉ. किरण महाजन

एस.पी. हवालदार सरांमुळे
आयुष्याला आकार
शहरातील विद्यार्थ्यांसारख्या सोयीसुविधा आणि शिकवण्यांद्वारे शिक्षण आम्हाला मिळत नसले, तरी त्या वेळी आमचे मुख्याध्यापक असलेल्या कै. एस.पी. हवालदार सर आणि अन्य शिक्षकांच्या विद्यार्थ्यांप्रति ज्ञानार्जनाच्या तळमळीचा मोठा फायदा आम्हाला झाला. माझ्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे डॉ. किरण महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचालीची जणू प्रेरणा
सांगली जिल्ह्यातील वाळवा या अत्यंत ग्रामीण भागातील एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या माझ्यावर अशिक्षित असलेली आई आणि जुन्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वडिलांच्या संस्कारांची मोठी देणगी होती. राबराब राबणारे त्यांचे हात मला आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची जणू प्रेरणा देत होते.
ंघरची परिस्थिती गरिबीची असल्याने जि.प.च्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मी पद्मभूषण क्रांतिवीर कै.डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा किसन वीर विद्यालयात शिक्षण पूर्ण केले.

...अन् जीवनाला कलाटणी मिळाली...
पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माझे गुरुवर्य डॉ. शिवाजी डांगे यांनी मला एमपीएससी स्पर्धा परीक्षेकडे वळवले. या परीक्षांचे अमूल्य असे शिक्षण त्यांनी आम्हाला दिल्याने आज मी जो उच्च पदावर आहे, त्याचे मोठे श्रेय त्यांच्याकडे जात असल्याचे डॉ. महाजन मोठ्या अभिमानाने सांगतात. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसेनानी असलेल्या कै.डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या विचारांचा मोठा पगडा आम्हा विद्यार्थ्यांवर होता, असेही ते सांगतात.

डॉ. डांगे सरांचा मोलाचा सल्ला
उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईमधील पशुवैद्यकीय महाविद्यालय गाठले. तेथील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर परीक्षेच्या दिशेने तयारी चालवली. याच काळात पशुवैद्यकीय महाविद्यालयातील गुरुवर्य डॉ. शिवाजी डांगे सरांचा सल्ला माझ्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.

Web Title: We happened because of the teacher's thirst for knowledge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.