शस्त्रपरवानाधारकांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:31 AM2018-02-06T05:31:21+5:302018-02-06T05:31:25+5:30

देशभरातील शस्त्रपरवानाधारक, शस्त्रदुरुस्ती, खरेदीविक्री परवानाधारकांना आपली माहिती एनडीएएल (नॅशनल डेटाबेस फॉर आर्म्स लायसन्सेस) या प्रणालीमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत नोंदवावी लागणार आहे.

We will investigate the weapon holders | शस्त्रपरवानाधारकांची तपासणी होणार

शस्त्रपरवानाधारकांची तपासणी होणार

Next

विरार (पालघर): देशभरातील शस्त्रपरवानाधारक, शस्त्रदुरुस्ती, खरेदीविक्री परवानाधारकांना आपली माहिती एनडीएएल (नॅशनल डेटाबेस फॉर आर्म्स लायसन्सेस) या प्रणालीमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत नोंदवावी लागणार आहे. यापूर्वी ही मुदत १ एप्रिल २०१६ पर्यंत होती. या नव्या आदेशामुळे पालघर जिल्ह्यातील शस्त्रपरवानाधारकांना जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांना आपापल्या शस्त्रपरवान्यांची माहिती द्यावी लागणार आहे. दरम्यान, यासंबंधीचे आवाहन राज्य शासनाच्या गृह विभागाने केले आहे. यापूर्वी ही प्रक्रि या दि.२१ मार्च २०१७ रोजी बंद करण्यात आली होती. परंतु, आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २८ नोव्हेंबर २०१७ च्या अधिसूचनेद्वारे एनडीएएल प्रणालीमध्ये माहिती नोंदवून घेण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे. या माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती, शस्त्राची तसेच शस्त्रउत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे.

Web Title: We will investigate the weapon holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.