ग्रामीण भागातील आठवडाबाजारांना नोटाबंदीचा फटका

By admin | Published: December 22, 2016 05:27 AM2016-12-22T05:27:11+5:302016-12-22T05:27:11+5:30

आदिवासी व ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना नोटाबंदीचा फटका बसला असून सुट्टया पैशाच्या तुटवडयामुळे बाजारातील

Week break in the rural areas of the country | ग्रामीण भागातील आठवडाबाजारांना नोटाबंदीचा फटका

ग्रामीण भागातील आठवडाबाजारांना नोटाबंदीचा फटका

Next

कासा : आदिवासी व ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना नोटाबंदीचा फटका बसला असून सुट्टया पैशाच्या तुटवडयामुळे बाजारातील खरेदी विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडाभराची खरेदी करणाऱ्या मजूरी, रोजंदारी करणाऱ्या ग्राहकांबरोबरच गरीब कुटुंबातील ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे.
डहाणू तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील कासा, वाणगांव, आशागड, गंजाड, धुंदलवाडी, वरोती, तवा, बापूगाव, सायवन आदि ठिकाणी आठवडा बाजार भरतात. या आठवडा बाजारात कांदा बटाटा, हिरवा भाजीपाला, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री दुकाने असतात. त्याचबरोबर कपडे, भांडी, रोजच्या आहारातील वस्तू, घरगुती वापराच्या विविध वस्तू, लग्नसमारंभातील काही वस्तू विक्रीसाठी दुकानदार फेरीवाले आणतात.
ग्रामीण भागातील वीट भट्टी, ट्रक हमाली, बांधकाम, रस्ते आदी ठिकाणी काम करणाऱ्या मजूर वर्गाची खरेदीची मदार या आठवडा बाजारावरच असते. त्यामुळे मजुरांचा आठवड्याचा पगार किंवा खर्चही बाजाराच्या दिवशी व्यवसायिक करतात. हे मजूर आठवडाभर लागणारे धान्य भाजीपाला व वस्तू बाजारातून खरेदी करातात. तसे परिसरातील नागरिकही आठवडा बाजारातून आठवडयाची खरेदी व विविध जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. तसेच गरीब कुटुंबे लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या वस्तू व अन्नधान्य घटक बाजारातूनच खरेदी करतात. त्यामुळे ग्रामिण व आदिवासी भागातील नागरिकांची खरेदी आठवडाबाजारावरच अवलंबून असते. मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या १००० व ५०० रू नोटा बंदीमुळे चलन टंचाई निर्माण झाली असून सुट्ट्या पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामधून २००० रू.च्या नोटा दिल्या जात असल्याने व्यावसायिकांकडून मजूरांना खर्चापोटी २००० रूपये दिले जातात.
सुट्ट्या पैशाच्या तुटवडयामुळे परिसरातील नागरिक २००० रूपयांच्या नोटा बाजारात खरेदीसाठी नेतात. दरम्यान, बाजारातून २० रू ३० रू टॉमेटो, कांदा, वांगी, बटाटे आदी भाजी विक्रेते प्रत्येक ग्राहकास एवढ्या मोठया मोठया सुट्या नोटा देऊ शकत नाही. (वार्ताहर)

Web Title: Week break in the rural areas of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.