तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:21 PM2019-07-05T23:21:15+5:302019-07-05T23:24:29+5:30

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले.

What should be the rocks like a dam? | तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

googlenewsNext

- हुसेन मेमन

जव्हार : गळतीमुळे चर्चेत असलेले पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेले आणि आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार तालुक्यातील खडखड धरण हे बांधल्यापासून गळत असल्यामुळे सतत चर्चेत आहे. नुकतेच रत्नागिरी येथील तिवरे धरण निकृष्टकामामुळे फुटले
व त्यात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच खडखड येथील डोमीहीरा हे धरणही फुटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी असा पाऊस पडतो, मात्र आज ही जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पिण्याचे पाणी दूरवरून नेण्याची कसरत करावी लागते. येथे नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासन दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून विहीर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार करून देत आहे.
जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. धरण २०१२ मध्ये ९५ टक्के
पूर्ण झाले. मात्र धरणाची भिंत ठिकाणी लीक असल्याचे त्यात पाणी भरताच समजले, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले निकृष्ट काम जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

आम्ही इतकी वर्षे जीव मुठीत धरूनच जगतो आहोत
- याबाबत कित्येकवेळा तक्र ारी झाल्यावर ठेकेदाराला पुन्हा दुरूस्ती करावी लागली. मात्र गळती अद्याप थांबलेली नाही, निकृष्ट मालाचा वापर करून बांधलेल्या बंधारा कसा टिकेल? त्यामुळे कितीही वेळा गळती काढली तरी गळती थांबणार का? स्थानिक रहिवासी आपले जीव मुठीत घेऊनच इतके वर्ष वास्तव करीत आहेत.
- डॅम बांधल्यापासून आम्ही भयभीतच आहोत, निकृष्ट बांधण्यात आलेल्या डॅमला पहिल्या वर्षापासून लागलेली गळती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी डॅम फुटून एखादी दुर्देवी घटना घडेल की काय या दहशतीखाली जगतो आहोत.

Web Title: What should be the rocks like a dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.