विरारचा पादचारी नवा पूल काय कामाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:02 AM2019-01-06T06:02:13+5:302019-01-06T06:02:26+5:30
रिक्षाचालकांचा विळखा : प्रवाशांसाठी ठरतोय अत्यंत धोकादायक, रेल्वेचे दुर्लक्ष
विरार : काही दिवसापूर्वीच सुरु झालेला विरार पूर्व पश्चिम पदचारी पूल रिक्षांचालकांनच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी केलेला हा पूल नागरिकांना त्रासदायकच ठरतो आहे. विरार पूर्वेला ज्या ठिकाणी पूल संपतो त्या ठिकाणी रिक्षा चालक आपल्या रिक्षा उभ्या करून गर्दी करत असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
विरार मध्ये १ नंबर फ्लॅटफॉर्म वरून पूर्वेस येण्यास, नागरिक रेल्वे रुळाचाच जास्त वापर करत होते आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. त्यानंतर आता एक महिन्यापूर्वी पालिकेने येथे नवीन पूल सुरु केला आहे. मात्र विरार पूर्वेला रिक्षा चालक येथे गर्दी करत असल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रोज प्रवाश करणाºया लोकांची सकाळी ट्रेन पकडण्याची घाई तर सायंकाळी घरी जाण्यची धावपळ असतेच त्यातच रिक्षावाले येथे गर्दी करून उभे राहतात व त्या प्रवाशांना अडचण निर्माण करतात. हा पूल तयार होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, आताच त्याची परिस्थिती अशी आहे. तर येणाºया सहा महिन्याभरात या पुलाची अवस्था अजूनच बिकट होईल, असे प्रवसी अविनाश जगताप यांनी सांगितले. ह्या रिक्षा चालकांवर महापालिकेने कारवाई करून प्रवाशांना होणाºया त्रासातून लवकरात लवकर मुक्त करावे असे देखील जगताप यांनीे सांगितले आहे.