महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:33 AM2018-08-04T00:33:29+5:302018-08-04T00:33:35+5:30
सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे.
- आरिफ पटेल।
मनोर : सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
या प्रकरणी पालघर जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र देसाई यांनी विरोधीपक्ष नेत्यांकडे तक्रार केली होती. महावितरणचे कनिष्ठ अभियंते भैरवनाथ पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वीज वितरणाच्या कामामध्ये केलेल्या गैरप्रकाराला या मुळे वाजा फुटली असून या चौकशीच्या फेºयामध्ये अनेक जण अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सफाळे भागातील सदनिकांना नियमबाह्य वीज जोडण्या देणे, एकच घर नंबर असणाºया एकाच ग्राहकाला एका पेक्षा अधिक वीज जोडण्या देणे, ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता मीटर काढून नेणे, वर्ष २०१० च्या काळात अनेक शॉट सक्रीट होऊन अनेक जण दगावण्याच्या घटना, तसेच या घटनांची चूकीची रिपोर्टींग करुन वरिष्ठांची व नागरिकांनी दिशाभूल करणे आदी आरोपांची उल्लेख त्यात आहे. त्याशिवाय उप कार्यकारी अभियंता हे गत पाच वर्षांपासून एका जागी असून त्यांची बदली कधी होणार असा मुद्दा ही या निवेदनामध्ये आहे.
त्या अनुशंगाने विखेपाटील यांनी तारांकीत प्रश्न (४३८२५) उपस्थित केला. अशोक उर्फ भाई जगताप, शरद रणपिसे, संजय दत्त, रामहरी रु पणवर श्रीमती हुसनबानू खिलफे या आमदारांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या संदर्भात खुलासा मागितला होता. त्यावर उर्जा मंत्री म्हणाले की, ‘होय हे अंशत: खरे आहे. या गैरव्यवहाराची चौकशी दि.१७ मे २०१८ रोजी करण्यात आली आहे.
आता प्रशासन काय कारवाई करते
या प्रकरणी मला चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या वर पुढील योग्य ती कार्यवाही मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ यांच्या स्तरावर करण्यात येईल.’ या उर्जामंत्र्याच्या उत्तरानंतर दोषींवर काय कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बोगस वीज जोडण्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असल्याचे पुन्हा स्पष्ट होत आहे.