लोकमतमध्ये वृत्त येताच कूपनलिका झाली खुली

By admin | Published: February 18, 2017 06:25 AM2017-02-18T06:25:35+5:302017-02-18T06:25:35+5:30

माजी उपसरपंचाने सार्वजनिक कूपनलिकेवर केला कब्जा’ हे वृत्त लोकमतमध्ये येताच ही कूपनलिका गावासाठी खुली झाली

When the news came, the bribe went open | लोकमतमध्ये वृत्त येताच कूपनलिका झाली खुली

लोकमतमध्ये वृत्त येताच कूपनलिका झाली खुली

Next

वाडा : ‘माजी उपसरपंचाने सार्वजनिक कूपनलिकेवर केला कब्जा’ हे वृत्त लोकमतमध्ये येताच ही कूपनलिका गावासाठी खुली झाली.
तालुक्यातील उसर ग्रामपंचायती मधील शिंदेवाडी येथील सार्वजनिककूपनलिकेचा ताबा माजी उप सरपंचाने घेऊन गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले होते या साठी चार दिवसांपासून ग्रामस्थांनी उपोषण केले होेते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच त्याकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधले गेले व अखेर ती कूपनलिका गावकऱ्यांसाठी खुली करण्यात आली.
सरपंच व ग्रामसेवकांनी मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले व तत्काळ कूपनलिकेचे पाणी सर्वांसाठी खुले करून दिले. हे अांदोलन यशस्वी होण्यासाठी महेंद्र जाधव , संदीप दुबेले, सुधाकर शिंदे, पांढुरंग जाधव ,समिक्षा दुबेले, प्रीती वाघे काशिनाथ पाटील, संतोष वारघडे यांनी विशेष मेहनत घेतली. (वार्ताहर)

Web Title: When the news came, the bribe went open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.