मलवाडा पुलाच्या वाहून गेलेल्या मलमपट्टीवर उपाययोजना कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:59 PM2019-12-28T22:59:05+5:302019-12-28T22:59:08+5:30
पिंजाळी नदीत तात्पुरता मातीभराव; वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची भीती
वाडा/विक्रमगड : ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार या राज्य महामार्गावरील पिंजाळी नदीवर मलवाडा येथे असलेल्या पुलाचा एका बाजूचा भाग पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला आहे. या ठिकाणी बंद झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी माती-भराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात या ठिकाणी कायमस्वरूपी काहीच उपाययोजना न केल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे.
गेल्या आॅगस्ट महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार मार्गावरील पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथे ३५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचा एक भाग वाहून गेला. एका बाजूचा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. पादचारी वाटही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील ८ ते १० गावांचा संपर्कही तुटला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी मातीभराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र गेल्या सहा महिन्यात कायम स्वरुपी या ठिकाणी नव्याने तीन गाळे टाकण्याचे काम न केल्याने पुन्हा हा मातीचा भराव वाहून जाऊन हा मार्ग बंद पडू शकतो. तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, वाहून गेलेल्या या पुलाचा हा भाग २८ आॅगस्ट २०११ या सालीसुद्धा या नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह याच भागातून अधिक प्रमाणात जात असल्याने या ठिकाणी पुन्हा माती भराव न करता पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी तीन ते चार गाळे करण्यात यावेत, अशी मागणी मलवाडा ग्रामस्थांनी केली आहे.
अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेशाम शवाडा-विक्रमगड-जव्हार या तीन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे, प्रशासनाने तातडीने या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
- चंद्रकांत पाटील, सरपंच,
ग्रामपंचायत, मलवाडा
या पुलाची दुरुस्ती करताना माती भरावाने न करता या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी तीन ते चार गाळे काढून त्यावर स्लॅब टाकावा.
- कमलाकर पाटील,
ग्रामस्थ, मलवाडा.