शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:42 AM2018-02-13T02:42:40+5:302018-02-13T02:43:20+5:30
या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदान मिळायला हवे होते.
विक्रमगड : या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदान मिळायला हवे होते. परंतु ते न मिळाल्याने काहींची शौचालये अर्धवट राहिली. त्यांनी अनुदानासाठी तगादा लावला. ते आलेच नाही असे उत्तर ग्रामपंचायतीकडून मिळत होते परंतु अनुदान आले असतांनाही त्याचे वाटप केले नाही व त्याचा अपहार झाला. हे लाभार्थी आजही अनुदानच्या प्रतिक्षेत आहेत. हा प्रकार उपसरपंच सुरेश पालवी यांनी उघड केला त्याच काळात मुंबई रोटरी क्लब ने ८० शौचालये बांधून दिली होती त्याचा खर्च रोटरीने केला होता मात्र तो ग्रा.पंने केल्याचे दाखवून ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीतून पैसे काढले असा आरोप ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयाना दिलेल्या निवेदनात केला असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दोषींवर कारवाई कधी?
काही शौचालये रोजगार हमीतूनही बांधले आहेत त्यांच्याही अनुदानाची रक्कमही हडप करण्यात आली आहे या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु अजून ती सुरूच आहे. ती कधी संपणार व दोषींवर कधी कारवाई होणार हा सवाल आहे.