किन्हवली पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:04 AM2020-03-03T01:04:16+5:302020-03-03T01:04:21+5:30

किन्हवली गावात असलेल्या किन्हवली पोलिसांच्या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरांत राहण्याची वेळ आली आहे.

When will the muhurat get the status of a Kinhwali police settlement? | किन्हवली पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार?

किन्हवली पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार?

Next

वसंत पानसरे 
किन्हवली : किन्हवली गावात असलेल्या किन्हवली पोलिसांच्या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरांत राहण्याची वेळ आली आहे. ९३ गावपाड्यांच्या कायदा-सुव्यवस्थेचा भार सांभाळणाºया किन्हवली पोलिसांच्या वसाहत इमारतींची २० वर्षांपासून दुरु स्तीच झाल्याने दोन्ही चाळींना अखेर टाळे लावावे लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर भाड्याने राहण्याची वेळ आली आहे.
किन्हवली पोलीस ठाण्यावर ९७ हजार ११५ इतक्या लोकसंख्येच्या सुरक्षेचा भार आहे. किन्हवली, शेणवा, सोगाव, शेंद्रूण, डोळखांब बीटअंतर्गत एक सहायक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पाच सहायक पोलीस उपनिरीक्षक, आठ पोलीस हवालदार, सहा पोलीस नाईक, १३ पोलीस शिपाई आणि नऊ महिला पोलीस शिपाई असे दोन अधिकारी आणि ४१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या निवासासाठी १९६०-६१ मध्ये अधिकारी निवास, १९६२ मध्ये चाळ क्रमांक-२ व १९६३ मध्ये चाळ क्र मांक-३ अशा निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. सुरु वातीला १५ पोलीस कुटुंबे येथे राहत होती. २० वर्षांपासून कुठल्याही प्रकारची डागडुजी न झाल्याने इमारतींच्या भिंतींना भगदाडे पडली आहेत. तसेच दारे-खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. शौचालये व मलनि:सारण व्यवस्था निकामी झालेली आहे. गळक्या छपरावर गवताचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या पोलीस कर्मचाºयांनी आपापल्या खोल्यांना टाळे लावून भाड्याच्या घराला पसंती दिली आहे. वसाहतीच्या दुरु स्तीसाठी महाराष्ट्र शासनाने १८ लाख दोन हजार ४०९ रु पये इतका निधी मंजूर केला होता. मात्र, हा निधी प्रत्यक्षात वितरित न झाल्याने २० वर्षांपासून दुरु स्तीचे काम रखडले आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यांनी पोलीस ठाण्याची जागा नावावर करण्याबाबतचा प्रस्ताव मागवला असून जिल्हाधिकाºयांना विनंती करून जागेच्या मालकीबाबतचा अडथळा दूर करण्याचे आश्वासन दिल्याचे किन्हवलीचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे म्हणाले.
>जागेच्या मालकीची तांत्रिक अडचण
शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या कार्यकाळात संबंधित इमारतींची पाहणी करून नव्या इमारतीचा प्रस्ताव पुढे पाठवला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. पोलीस ठाण्याच्या कब्जात असलेली १०९० चौरस मीटर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे असल्याने कोणतेही नवे बांधकाम करता येत नसल्याची माहिती गजेंद्र पालवे यांनी दिली.

Web Title: When will the muhurat get the status of a Kinhwali police settlement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.