अंगणवाडीची ८० केंद्रे साकारणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:15 AM2017-08-13T03:15:39+5:302017-08-13T03:15:39+5:30

अनेक मंजूर अंगणवाडी केंद्रांना निधी नाही, ज्यांना दिला त्यापैकी अनेकांची कामे सुरू नाही जिथे कामे सुरू आहे त्यांची गती कूर्म आहे. अशी अवस्था या तालुक्यातील अंगणवाड्यांची आहे.

When will you start 80 centers of Anganwadi? | अंगणवाडीची ८० केंद्रे साकारणार कधी?

अंगणवाडीची ८० केंद्रे साकारणार कधी?

Next

- राहुल वाडेकर

विक्रमगड : अनेक मंजूर अंगणवाडी केंद्रांना निधी नाही, ज्यांना दिला त्यापैकी अनेकांची कामे सुरू नाही जिथे कामे सुरू आहे त्यांची गती कूर्म आहे. अशी अवस्था या तालुक्यातील अंगणवाड्यांची आहे. यामुळे ८० केंद्रांच्या इमारती साकारणार कधी? हा प्रश्न कायम आहे.
तालुक्यात सध्या २४६ अंगणवाडी केंद्रे (मूळ) व ६२ मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत़ विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयापाडयात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यांत आली आहेत़ त्यानुसार गेल्या १७ वर्षापूर्वी विक्रमगड-रोहिदासनगर येथे मिनी अंगणवाडी कार्यरत असून सद्यस्थितीत या मिनी अंगणवाडीच्या परीसराची लोकसंंख्या ५७५ झाल्यामुळे तिचे रुपांतर अंगणवाडीत होणे गरजेचे आहे. तरीही ते झालेले नाही.
गेल्या १७ वर्षामध्ये तिचे रुपांतर मुळ अंगणवाडीमध्ये न झाल्याने तिला स्वत:ची अशी वास्तू नाहीच मात्र भाडयाची देखील जागा नसल्याने आज इथे तर उद्या तिथे अशी रोज नवीन जागा तिला शोधावी लागते. याबाबत बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविलेला असल्याचे सांंगण्यात आले तर मिनी अंगणवाडी करीता इमारतीची तरतूद नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र यामध्ये शिक्षण घेणा-या लहान बालकांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो आहे़ आज या अंगणवाडी अंतर्गत ३ ते ७ वर्षा दरम्यानची ३५ मुले, ३ ते ६ वर्षाखालील ४३ मुले, १४ गरोदर माता, ४ स्तनदा माता आणि महत्वाचे म्हणजे मॅमची ४ मुले (१़ अविनाश विलास गवळी, २़ गौरी संजय भोये, ३़ दुर्वेष समीर खुताडे, ४ जय गणेष पडवळे) आहेत़ तालुक्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी ८० अंगणवाडयांना स्वत:च्या जागा नसल्याने त्या खाजगी इमारतीत, शाळेमध्ये, समाजमंदिरात भरविल्या जात आहेत. अगोदरच शासनाकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. त्यात स्वत:ची इमारत नसल्याने अडचणी समोर येत असतात.
या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातील ८० अंगणवाड्यांच्या अनेक नव्या वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्ताव पाठविण्यांत आले. त्यानुसार काही केंद्रांना मंजुरी देण्यांत आली आहे तर २२ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीसाठी मंजुरी नाही तर मंजुर इमारतींची कामेही संथगतीने होत आहेत व काही ठिकाणी सुरुवातही झालेली नसल्याने नवीन अंगणवाडी केंद्रे कधी साकारणार? असाही सवाल या अंगणवाडी केंद्रामध्ये शिक्षण घेणा-या मुलांच्या पाल्यांनी केला आहे़
विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडया व मिनी अंगणवाडया एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत चालविल्या जात आहेत.

यांसदर्भात वारंवार प्रस्ताव देऊन व मागणी करुनही अंगणवाडीस मंजुर मिळालेली नाही व आज या मिनी अंगणवाडीस जागा नसल्याने यामध्ये शिक्षण घेणा-चा चिमुकल्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत तर तालुक्यातील इतरही अंगणावडयांची हीच परिस्थीती असून जवळ जवळ २४६ अंगणवाडी केंद्रापैकी ८० अंगणवाडी केंद्राना इमारती नसल्याने त्या आजही खाजगी जागेमध्ये भरविल्या जात आहेत़ -लक्ष्मण पडवळे, जिल्हा उपध्यक्ष श्रमजीवी संघटना

यासंदर्भात प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवून त्यांच्या आदेशानुसार योग्य ती उपाय योजना केली जाईल
-बी़ बी शिंगारे,
ए़ बा़ वि़ प्ऱ अधिकारी विक्रमगड

Web Title: When will you start 80 centers of Anganwadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.