दहा वर्षातील निधी गेला कुठे?
By admin | Published: December 9, 2015 12:32 AM2015-12-09T00:32:15+5:302015-12-09T00:32:15+5:30
या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग
श्याम राऊत, टोकावडे/मुरबाड
या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,लोकनिधींचे आर्थिक योगदान, श्रमदान,अशा प्रकारे अनेक योजना राबवून ,नदी नाल्यावर माती बंधारे,सिमेंट बंधारे,नाला बंडींगच्या माध्यमातून पाणी अडवण्याची कामे करण्यात आलीत.मात्र १९७२नंतर प्रथमच पाणी टंचाई,आणि दुष्काळ दिसू लागल्याने, नवीन बंधारे बांधले जावेत असे प्रशासनाला वाटू लागले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचा खटाटोप शासकिय यंत्रणा करीत आहे.मात्र दहा वर्षात केलेला लाखोंचा खर्च गेला कुठे याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात २२७ महसूल गावात नदी नाल्यावर ठिकठिकाणी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, वनी विभाग, कृषी विभाग,सामाजिक वनीकरण,पाणलोट क्षेत्र विकास,योजनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात कोट्यावधींचा खर्च पक्के बंधारे,माती बंधारे,नाला बडींग,वनीकरण,यावर करण्यात आला.केलेली कामे कशी होतात . याची देखरेख वरिष्ठ अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार अशांची असतांना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी त्यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.तर अधिकारी टक्केवारीच्या भागिदारीमु्ळे ठेकेदाराना पाठीशी घालण्यात ते धन्यता मानत असल्याने केलेली कामे चांगली कशी होणार? त्यामुळे बंधाऱ्यांच्या वरून पाणी जाण्या ऐवजी खालून पाणी जाते.आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्ह्यातील नागरीकांना श्रमदानातून वन बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्याला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद देऊन ,नदी नाल्यावर बंधारे बांधले.
१९७२ नंतर ठाणे जिल्ह्यात पाण्याची समस्या उध्भवणार असल्याने प्रशासन जागे झाले .परंतु दहा वर्षात
किती कोटी खर्च पाण्यावर झाले याचा शोध कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी जोशी मॅडम यांनी घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. मागील कालावधीतील या कामांचा आढावा घेतल्यास ,पाणी जिरवण्याऐवजी पैसे जिरवले, असेच चित्र आहे.