कुठे खरेदीचा जोर तर कुठे बाप्पांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 04:12 AM2017-08-25T04:12:48+5:302017-08-25T04:12:53+5:30

संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारचा दिवस खरेदीचा आणि बाप्पांच्या आगमनाचा ठरला. शुक्रवारी रस्त्यावर वाढणारी गर्दी तसेच स्थापनेसाठी होणारी धावपळ पाहता अनेक गणेश भक्तांनी श्रींच्या मुर्ती आदल्या दिवशींच घरी आणणे पसंत केले.

Where do the purchasing power of the father's arrival? | कुठे खरेदीचा जोर तर कुठे बाप्पांचे आगमन

कुठे खरेदीचा जोर तर कुठे बाप्पांचे आगमन

Next

पालघर : संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारचा दिवस खरेदीचा आणि बाप्पांच्या आगमनाचा ठरला. शुक्रवारी रस्त्यावर वाढणारी गर्दी तसेच स्थापनेसाठी होणारी धावपळ पाहता अनेक गणेश भक्तांनी श्रींच्या मुर्ती आदल्या दिवशींच घरी आणणे पसंत केले. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी संचलन केले.
गणपती सणानिमित्त वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर या शहरीभागांमध्ये तुडूंब गर्दी पहायला मिळाली. अनेक ठिकाणी नारळ, फुले व फळांचे बाजार वधारलेले दिसले.
जव्हारमध्ये खरेदीसाठी झुंबड
येथे खेडोपाड्यातुन हजारो गणेश भक्त श्रींच्या मुर्ती घेऊन गावाकडे घेऊन जात असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. सजावटी करीता लागणारे साहित्य खरेदीकरीता बाजारात मोठी झुंबड उसलळी होती.
किराणा साहित्य, फळ, गुलाल, सजावटीचे साहित्य, रेडीमेड मखर, फुल, हार, अगरबत्ती आदि वस्तू खरेदीकरीता शहरातील व खेडोपाड्यातील भक्तांनी गर्दी केलेली होती. जव्हार तालुक्यात बहुतेक खेडोपाड्यात एक गाव एक गणपती बसविण्याची प्रथ आजही कायम असून गावातील सार्वजनिक मंडळातर्फे एक दिवस आगोदरच तयारी करून वाजत गाजत बाप्पाच्या मुर्ती नेल्या जात होता. सुबक व आकर्षक मुर्ती खरेदी करीता शहरात ठिकठिकाणी भक्तांची गर्दी दिसत होती.
जव्हार शहरातून आजु बाजुच्या खेडोपाड्यातील आदिवासी बांधवाकडून दरवर्षी हजारो गणेशाच्या मुर्तीचीं विक्र ी होते. तसेच इतर तालुक्यातील व्यापारीसुद्धा येथून मोठ्याप्रमाणात मुर्तीं घेऊन ठिक ठिकाणी तिची विक्री करतात. आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात एक दिवस आगोदरच ढोल ताशांच्या गजरात मुर्ती घेऊन आपल्या गावी जात होते. शहरात जवळ जवळ ५५० मंडळ व घरगुती गणपतींची स्थापना होते. यात ५ दिवसांचे गणपती बसविण्याची संख्या जास्त आहे.
गणपती डकोरेशनला सुध्दा चांगलीच गर्दी दिसत होती. तयार मखर, देव्हारे, तसेच इकोफ्रेंडली मखरांना मागणी पहायला मिळत होती. पुर्वी हेच मखर अथवा डेकोरेशन नागरीक स्वत: आपल्या हाताने करत होते. त्यासाठी १५ दिवस आगोदरच तयारी होत होती. त्यावेळी लोक हौशीने रात्री जागरण करून नव नविन शक्कल लडवून निरिनराळे डेकोरेशन करीत होते, परंतू सध्या चाईना मेड डेकोरेशन मुळे अनेकांनी त्यांनाच पसंती दिल्याचे दिसले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रेट यंदा वाढलेले दिसले तरी खरेदीमध्ये कुठे ही त्याचा परिणाम दिसला नाही.

गणरायाच्या स्वागतासाठी तलासरी सज्ज : शुक्र वार पासून गणेशोत्सव सुरू होत असून गणरायाच्या स्वागता तलासरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मंडळे मंडप व सजवटीवर अखेरचा हात फिरवत आहेत तर बाजारात सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाची झुंबड उडाली आह. या गणेश उत्सवा करीता तलासरी पोलिसही सज्ज असून गुरु वारी तलासरी पोलीसांनी गावातून संचालन केले. तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५३ गणरायाची स्थापना होणार आहे. आदिवासी भागातील तरु ण पोटापाण्यासाठी कारखान्यात जात असल्याने दहा दिवसांच्या उत्सवा करिता त्याला वेळ मिळत नसल्याने परिसरात तीन दिवसांच्या गणरायाची संख्या जास्त आहे. पण हे तीन दिवसही तो मोठ्या उत्साहाने गणरायाची सेवा करतो. डीजेवर बंदी असल्याने उत्सवाच्या ठिकाणी आपल्या पारंपरिक तारफा नृत्य सादर करतात. यात आदिवासी तरु ण-तरु णी आनंदाने भाग घेऊन गणरायाचे मनोरंजन करतात. या वेळी गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी मंडळाच्या कार्यकर्त्यां बरोबर तलासरी पोलिसही विशेष दक्ष आहेत.

Web Title: Where do the purchasing power of the father's arrival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.