कुठे पारडे फिरले तर, कुठे प्रस्थापितच सरस

By admin | Published: December 24, 2016 02:59 AM2016-12-24T02:59:03+5:302016-12-24T02:59:03+5:30

विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १६ नगरसेवकान मधून आज झालेल्या नगरअध्यक्ष पदाचा निवडणुकीत

Where do you wander around, where is the founder gelatin | कुठे पारडे फिरले तर, कुठे प्रस्थापितच सरस

कुठे पारडे फिरले तर, कुठे प्रस्थापितच सरस

Next

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १६ नगरसेवकान मधून आज झालेल्या नगरअध्यक्ष पदाचा निवडणुकीत विक्रमगड विकास अघाडीचे रविंद्र विलास खुताडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांना यापूर्वीच विकास आघाडीचे सहा नगरसेवकांचा तसेच राष्ट्रवादी चा एक, भाजपाच्या दोन अशा एकूण दहा नगरसेवकानी हात वर करून मतदान केल्याने खुताडे याची नगरअध्यक्षपदी निवड झाली. तर उपनगरअध्यक्षपदी विकास आघाडीचे नगरसेवक नीलेश(पिंका) पडवले याचा विरोधात एक ही उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची उपनगरअध्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणूकीमध्ये शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेविका सुनिता नाईक यांनी नगराध्यक्ष निवडीकडे पाठ फिरवली होती. तर श्रमजीवी - जागृत विकास पैनलचा बाजुने सहा नगरसेवक होते. विक्र मगड नगरपंचायतीमध्ये दहा असे अधिक संख्या बळ मिळवून विकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. या नवनिर्वाचीत नगरअध्यक्ष, उपनगरअध्यक्षचे व नगरसेवकाचे तसेच विकास आघाडीचे संयोजक नीलेश सांबरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीकरुन विजयोत्सव साजरा करण्यात आला.
नगरअध्यक्षपदासाठी अनुसुचित जमातीचा पुरु ष आरक्षण असल्याने विकास आघाडीकडुन प्रभाग १३ मधुन ८७ मतांनी विजयी झालेले अनुसुतचित जमातीचे तरु ण तडफदार उमेदवार रविंद्र खुताडे हे हया पहिल्या नगरअध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान मिळवला आहे. तसा त्यांचा हा राजकारणातला पहिलाच अनुभव आहे.
या वेळी निवडणुकीचे पिठासन अधिकारी म्हणून मोहन नदलकर याचा सह तहसीलदार सुरेश सोनवणे यानी काम पाहिले तर सुरक्षेचा दृष्टीकोणातून अतिरक्त पोलिस फौजफाटामधे ५० पोलिस कर्मचारी व अधिकारी याना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, शांततेत निवडणूक पार पाडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
तलासरीच्या नगराध्यक्षपदी स्मिता वळवी, उपनगराध्यक्षपदी सुरेश भोये
तलासरी : तलासरी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता सुरेश वळवी यांची बिन विरोध निवड झाली तर उपनगराध्यक्ष पदी माकपाचेच सुरेश भोये यांचीही बिन विरोध निवड झाली. इतर दोघांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी केली. या वेळी तलासरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित होते.
दुपारी दोन वाजता निवडणूक कार्यक्रम सुरु होताच नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज रामिला जवालिया यांनी मागे घेतल्याने स्मिता सुरेश वळवी याची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा झाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज वसंत कोळी यांनी माघारी घेतल्याने सुरेश भोये यांची बिन विरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, नगरपरिषदेच्या एकुण १७ जागांपैकी माकपाला ११, भाजपाला ४ तर राष्ट्रवादी कॉग्रेस कडे २ नगरसेवकांची संख्याबळ असल्याने निवडणूकीचे चित्र स्पष्ट होते
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ची निवड घोषित करताच मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तलासरी नगर पंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. यावेळी माकपचे नेते वनशा दुमाडा , नंदू हडळ, शंकर उंबरसडा , सुभाष मलावकर , शांती मलावकर , शैला अंधेर , इत्यादिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्ष, व
उप नगराध्यक्ष याची कार्यकर्त्यांनी तलासरी गावातून विजयी मिरवणूक काढली. (वार्ताहर)

Web Title: Where do you wander around, where is the founder gelatin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.