‘शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:14 AM2019-02-09T02:14:03+5:302019-02-09T02:14:25+5:30
‘आता गावात पाणी आणलय, पुढे घरा - घरात पोहोचवणार, शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.
मोखाडा : ‘आता गावात पाणी आणलय, पुढे घरा - घरात पोहोचवणार, शिवसेना सत्तेत असो वा नसो, आदिवासींची सेवा करणारच’ असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. ते पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तालुक्यात जानेवारी संपताच पाणी टंचाईचे वातावरण असून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.
सध्या ५ गावे आणि ११ पाड्यांना ७ टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असूनही आदिवासी महिलांची पायपीट सुरूच आहे. ती थांबावी म्हणून शिवसेना व युवासेनेने तालुक्यातील किनिस्ते, गवरचरीपाडा, विकासवाडी, सोनारवाडी, चास हट्टीपाडा यासह अन्य ठिकाणी तीन हजार लीटर क्षमतेच्या १८ पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत त्यांचे उद्घाटन गुरुवारी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांना आमची नळयोजना मंजूर करा अशी मागणी किनिस्ते येथील आदिवासी महिलांनी केली. त्यावेळी आता गावात पाणी आणलयं, पुढे घरा - घरात पाणी पोहोचवणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथील महिलांना दिले. तर चास हट्टीपाडा येथे ठाकरे यांनी थेट आदिवासी महिलांमध्ये जाऊन, जमीनीवर बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौैऱ्यात त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, पालघर जिल्हा समन्वयक श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्र मगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील, मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगलाताई चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
येथील पाझर तलावाचे खोलीकरण, रु ंदीकरणासह तलावातील गाळ काढणे, नवीन एक लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि जलशुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रु पये खर्च करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.