सफेद जांबूला फळगळतीचा धोका; बागायतदार व विक्रेते हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:45 AM2018-03-20T01:45:02+5:302018-03-20T01:45:02+5:30
बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.
- अनिरु द्ध पाटील
बोर्डी : बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी घोलवड येथील पारसी कुटुंबियांनी सफेद जांबू या परदेशी फळझाडाची प्रायोगीकतत्वावर लागवड त्यांच्या बागायतीत केली. येथील मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान या पिकासाठी पोषक आहे. विशेषत: किनाऱ्यालगत या झाडाची वाढ जोमाने होऊन लागवडी पासून चौथ्या वर्षी फलधारणा होते. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आज लाल, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध आहेत. कमी उत्पादन खर्चात भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ठ आहे.
दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. तालुक्यात या झाडाची लागवड दीडशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. डिसेंबर महिन्यापासून सुरू होणारा बहार
तीन वेळा येतो. साधारणत: फेब्रुवारी ते मोसमी पावसाचा प्रारंभ हा फळाचा हंगाम आहे. हंगामाच्या प्रारंभीच संकट ओढवल्याने बागायतदार हवालिदल झाला बनला आहे.
उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी
या फळात सुमारे नव्वद टक्के पाण्याचा अंश असल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी आहे. प्रारंभी काळात स्थानिक आठवडे बाजारात आणि डहाणू, घोलवड या रेल्वे स्थानक परिसरात त्याची विक्र ी केली जात होती. मात्र, स्थानिक भाजीपाला रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील वसाहतीत विकणाºया येथील महिलांनी या फळाची विक्र ी सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळून शहरी बाजारात या फळाने भाव खाल्ला आणि मुंबईच्या बाजारात मक्तेदारी निर्माण केली. या फळाच्या विक्र ीतुन नफा मिळत असून तेथे हे फळ जाम या नावाने परिचित आहे.
फळझाडाचा प्रचार-प्रसार
घोलवड, बोर्डी आणि पंचक्रोशीतील माहेरवाशिनी हे फळझाड सासरी घेऊन गेल्याने त्याचा प्रसार पालघर जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्या मध्ये केळवे, माहीम, विरार, वसईचा समावेश आहे. शिवाय कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात भेट देणाºया राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्यांनी आपापल्या जिल्ह्यात त्याची लागवड करून पहिली मात्र त्या ठिकाणी ते यशस्वी झालेले नाही. गुटी कलमापासून नवीन रोपांची निर्मिती करता येत. शिवाय अगदी स्वस्तात कलम उप्लब्ध होते. त्यामुळे घरोघरी परसबागेत ते पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्षारोपण योजनेतून त्याचे वाटप स्थानिकांना केल्यास रोजगारासह हिरवापट्टा वाढेल.
वाढती उष्णता आणि पावसानंतर बदललेल्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळतीचा धोका असतो. शिवाय कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्लेनोफिक्स कीटकनाशकाची फवारणी आवश्यक आहे.
उत्तम सहाणे,
शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद, कोसबाड