राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:25 AM2018-04-29T00:25:03+5:302018-04-29T00:25:03+5:30

जिल्ह्यात वाढवण, जिंदाल बंदर, बुलेट ट्रेन आदी विनाशकारी प्रकल्पाचे बरोबरच, सूर्याचे पाणी, कुपोषण, रोजगार आदी महत्वपूर्ण प्रश्नांच्या आगीत इथला स्थानिक नागरिक होरपळत आहे

Who is the target of Raj Thackeray? | राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण?

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण?

googlenewsNext

हितेन नाईक 
पालघर : जिल्ह्यात वाढवण, जिंदाल बंदर, बुलेट ट्रेन आदी विनाशकारी प्रकल्पाचे बरोबरच, सूर्याचे पाणी, कुपोषण, रोजगार आदी महत्वपूर्ण प्रश्नांच्या आगीत इथला स्थानिक नागरिक होरपळत आहे. या वर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष १ मेची वसईची सभा आटपून २ मे रोजी पालघर मधील आदिवासी, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.
पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास विकासाची अनेक दालने उघडली जातील या सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरत असून जिल्हानिर्मितीनानंतर ४ वर्षाचा कालावधी उलटूनही स्थानिकांचे प्रश्न सुटण्याऐवजी त्यांच्यापुढे अनेक जीवघेण्या प्रश्नांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. सुर्या सारख्या आदिवासी आणि शेतकºयांना समृद्ध करणाºया प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याबाहेर वळवून इथले सिंचन क्षेत्र ओसाड पडण्याचे काम युतीच्या सरकारने केले आहे तर दुसरीकडे विक्र मगड, वाडा, पालघर, डहाणू या भागातील नागरिकाना आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्याचे घसे कोरडे पडत आहेत.
कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यवधी रु पयाचा खर्च केंद्र व राज्य शासनाकडून केला जात असताना कुपोषणाची दाहकता कमी करण्यास सत्ताधाºयांना अपयश आले आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्यसेवेची व्यवस्था पाहता त्याअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर दुसरीकडे रु ग्णांवरील उपचारासाठी गुजरात व सेलवास येथील रु ग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
पालघर जवळील नांदगाव किनाºयावर होऊ घातलेली जिंदाल जेट्टीमुळे परिसरातील मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, सातपाटी, वडराई सारख्या मासेमारी बंदराना धोका पोचून त्या बंदरासमोरील माश्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला गोल्डन बेल्ट संपुष्ठात येणार होता. तसेच, जवळ असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पास निर्माण होणारा धोका पर्यावरणाबरोबरीने समुद्राचे होणारे प्रदूषण आदी कारणांमुळे स्थानिकांचा या जेट्टीला मोठा विरोध असताना भाजप सरकारने वाढवण बंदराची घोषणा करून इथल्या स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. पालघर-ठाण्यातून धडधडत जाणाºया अहमदाबाद बुलेट ट्रेनने १४८.७२ किमीच्या मार्गावरील हजारो शेतकºयांच्या जमिनी आणि स्थानिकांची घरे उध्वस्त होणार आहेत. त्यापाठोपाठ डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर व मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे अशा प्रकल्पामध्येही इथला शेतकºयांच्या जमिनीवर वरवंटा फिरणार आहे.
या आदिवासीबहुल जिल्ह्यात तरु णांच्या नोकरीचा प्रश्न आ वासून उभा असून जिल्हा कौशल्य रोजगार विभागांतर्गत या तरु णांना नोकºयांची आश्वासने देणाºया सरकारने त्यांची पार फसवणूक केली असून जिल्ह्यात निर्माण होणाºया नोकºया स्थानिक तरु णांच्या डोळ्यासमोर बाहेरील उमेदवाराना बहाल केले जात आहेत. नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटना नेहमीची बाब झाली असून त्याचा फायदा जिल्ह्या बाहेरील उमेदवारांना मिळत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. जिल्ह्यातील डहाणू ते वैतरणा स्थानकांंदरम्यान उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळाला असला तरी येथील रेल्वे प्रवाश्यांचा समस्या सुटण्याचे नाव घेत नसून लोकल सेवेत वाढ होत नसून लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा दिला जात नसल्याने प्रवाश्यात मोठी नाराजी आहे.
शासनाच्या महत्वाकांक्षी अशा मनरेगा योजनेतून देण्यात येणारा रोजगार व त्याचे पैसे वेळीच दिले जात नसल्याने स्थलांतराचा मोठा प्रश्न उभा आहे. परिणामी रोजगाराच्या शोधार्थ हजारो कुटुंबाना जिल्ह्याबाहेरील इतर जिल्ह्यात जावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य, शिक्षण आदींसह कुटुंबातील त्यांच्या महिलांना शोषणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वसई सह अन्य काही तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून आठवड्यात तीन ते चार मुलींच्या अपहरणाच्या घटना, खून, लैंगिक शोषण, चेन स्नॅचिंग, शासकीय जागेवरील अतिक्र मण, खंडणी आदी विषयांना ते स्पर्श करतील अशी अपेक्षा आहे.

किनारपट्टीला भेट देऊन स्थानिकांशी साधणार संवाद
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे २ मे रोजी ते वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदी भागांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या धडाक्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली. सभेचा आराखडा पूर्ण झाला असून बैठक व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी पार्कींग झोन तयार करण्यात आले आहे. या सभेचे निवेदन पालघर पोलीसांना दिल्याची माहिती महाराष्टÑ नवनिर्माण शारीरीक सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजय दाभोळकर यांनी लोकमतला दिली आहे.

Web Title: Who is the target of Raj Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.