नगराध्यक्ष होणार कुणाचा?

By admin | Published: December 23, 2016 02:52 AM2016-12-23T02:52:24+5:302016-12-23T02:52:24+5:30

विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका शुक्रवारी होत असून

Who will be the city president? | नगराध्यक्ष होणार कुणाचा?

नगराध्यक्ष होणार कुणाचा?

Next

पालघर : विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका शुक्रवारी होत असून तलासरीच्या नगराध्यक्षपदी माकपच्या स्मिता वळवी यांची निवड होण्याची चिन्हे असून मोखाड्याच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मंगला चौधरी या बिनविरोध विराजमान होणार आहेत. तर विक्रमगडच्या बहुचर्चित नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल, हे गुलदस्त्याच राहिेले आहे.
विक्रमगडात उत्सुकता शिगेला
विक्रमगड : शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या आघाडीचा नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विक्रमगड विकास आघाडी आणि जागृत परिवर्तन आघाडी यांनी आपलाच नगराध्यक्ष होणार असे दावे केले आहेत. जागृत परिवर्तन पॅनलचे ६ नगरसेवक असून विक्रमगड विकास आघाडी काँग्रेस यांच्याकडे ७ नगरसेवक आहे. भाजपचे २ शिवसेनेचा व राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ असे बलाबल आहे. त्यामुळे या ४ नगरसेवकांना महत्व प्राप्त झाले आहे काही दिवसापूर्वीची जागृत परिवर्तन पॅनल व भाजप युतीची आशा मावळली आहे त्यामुळे भाजप शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे उद्याच स्पष्ट होणार आहे. विक्रमगड विकास आघाडीला राष्ट्रवादीच्या १ नगरसेवकांचा पाठींबा काल जाहीर झाला. परंतु राष्ट्रवादीने घूमजाव केल्यामुळे ते चित्रही फिसकटले आहे. काही दिवसापूर्वी नगरसेवकांची पळवापळवी ही झाली होती परंतु नंतर समीकरणे बिघडली त्यामुळे खरे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
तलासरीच्या नगराध्यक्षपदी स्मिता वळवी?
तलासरी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्र वारी दुपारी होत असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गेल्यात पडते या कडे तलासरी तील जनतेचे लक्ष लागले आहे.
तलासरी नगर पंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने तलासरी चा पहिला नगराध्यक्ष त्याचाच होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी माकपतर्फे स्मिता सुरेश वळवी व रामिला संदेश जवालिया या दोघीनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला स्मिता वळवी हिची वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे तसेच उपनगराध्यक्षपदासाठी सुरेश भोये यांनी अर्ज दाखल केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पक्ष जो उमेदवार निश्चित करेल तोच नगराध्यक्ष बनणार पण निवडणूक सोपस्कार म्हणून उद्याची नगराध्यक्ष ची निवडणूक होत आहे.
मोखाडा नगराध्यक्षपदी मंगला चौधरी तर उपनगराध्यक्षपदी महानंदा पाटील विराजमान होणार
उदया होणाऱ्या मोखाडा नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या मंगला चौधरी तर उपनगराध्यक्षपदी महानंदा पाटील यांच्या वर्णी लागणार आहे.
नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपा १ काँग्रेस १ राष्ट्रवादी २ तर सेनेने १७ पैकी १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते यामुळे सेनेचा नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट असताना राष्ट्रवादीच्या वैशाली माळी यांच्याकडून अर्ज सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
परंतु आज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असून नगराध्यक्षपदी मंगला चौधरी यांची तर उपनगराध्यक्षपदी महानंदा शांताराम पाटील यांची निवड होणार हे निश्चित झाले आहे.

Web Title: Who will be the city president?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.