आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:37 AM2019-04-04T03:37:27+5:302019-04-04T03:37:48+5:30

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर प्रखर टीका : स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

Whose country will you give in hand - Thackeray | आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

Next

बोईसर : काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रखर टीका करून आपण कोणाच्या हातात देश देणार आहोत असा प्रश्न विचारून स्थानिक समस्या प्राधान्याने सोडविणयात येतील असे आश्वासन दिले त्यांनी मनोरपासून नागझरी, बोईसर मार्गे पाचमार्ग, चिंचणी डहाणू असा दौर करून ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला.

लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणूकी तील शिवसेना -भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांचा हा दौरा आयोजित केला होता या वेळी सेना भाजपाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त व बाधित कामगारांचा प्रश्न, पालघर जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल, चौपदरी रस्ता, दांडी-नवापूर पूल इत्यादी समस्या बरोबरच वाढवण बंदराबाबत शिवसेना जनतेसोबत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या प्रचार दौऱ्यात हिंदूत्वासाठी युती करणे गरजेचे होते म्हणून युती केल्याचे सांगितले. तर वाढवण बंदराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी १९९८ साली वृत्तपत्रांत आलेल्या बातम्याची कात्रणे लोकांना दाखवून त्यावेळी नागरीकांनी विरोध केला म्हणून आम्ही हे बंदर रद्द केले. तसेच तेव्हापासून आताही स्थानिकांचा विरोध असेल तर वाढवण बंदर होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.शिवसेना व भाजपाच्या दोघांच्या मनात भगवा आहे. २०१४ साली च्या निवडणूकीतही देश भगवामय झाला होता असे ठाकरे यांनी सांगून गाविताना भरघोस मतानी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

जीवघेणा विकास नको!

विकास हवा आहे परंतु असा जीवघेणा विकास नको आम्ही नाणार रिफायनरीला स्थानिकानी विरोध केल्यानंतर ती रद्द करण्यास आम्ही सरकारला भाग पाडले आहे असे उध्दव ठाकरे यांनी जनसमुहाला सांगत पुन्हा एकदा वाढवण बंदराबाबत विरोधाची भुमिका असल्याचे सांगितले.

Web Title: Whose country will you give in hand - Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.