बविआच्या गोटात सन्नाटा ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:17 AM2019-05-24T00:17:02+5:302019-05-24T00:18:33+5:30

वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले.

why so silent in Bavia Party? | बविआच्या गोटात सन्नाटा ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’?

बविआच्या गोटात सन्नाटा ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’?

googlenewsNext

वसई : पालघर लोकसभेची महत्वाची जागा गमावल्याचे समजल्यानंतर पालघर सहित वसई- विरार तालुक्यातील आ. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडी व त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी सन्नाटा पसरला.


वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले. गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाठिकाणी निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच बविआचे बळीराम जाधव व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यातील चुरशीच्या लढतींविषयी केवळ पालघर जिल्ह्यालाच नाही तर या लढतींकडे उभ्या देश व राज्याचे लक्ष होतेच मात्र तशी एक मोठी उत्सुकता हि दोन्ही युती व आघाडी च्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र सकाळी १० नंतर गावित यांच्या बाजूने विजयाच्या आघाडीचा कल दिसू लागताच बविआ सहित मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांची धाकधुक बºयापैकी वाढली. नंतर पुढे निकाल स्पष्ट दिसू लागताच बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी व काँग्रेस समर्थकांचे चेहरे मात्र उतरले. एकूणच त्यावेळी देशभरात मोठं मोठ्या दिग्गजांच्या पराभवानंतर देशात व राज्यात सर्वत्र मोदी व सेनेची लाटच दिसत होती आणि आता केंद्रात सरकार येत असल्याच्या खुशीत महायुतीचे कार्यकर्ते चौकाचौकात गर्दी करू लागले.


यामध्ये मात्र बोईसर सहित वसई-विरार, नालासोपारा वसई गाव ,नवघर माणिकपूर शहर, वसई पूर्व पश्चिम आदी ठिकाणची बविआ कार्यालयात बºयापैकी कार्यकर्ते व नेते मंडळी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, महायुतीने वाटले लाडू पेढे
एकीकडं बविआ च्या मुख्यालयापासून ते वसई विरार आणि नालासोपारा येथील विविध पक्ष कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला तर दुसरीकडे देशात व राज्यात फक्त आणि केवळ मोदी लाट आल्याची आकडेवारी पाहिल्यावर याच पराभूत झालेल्या बविआच्या विविध कार्यालयाबाहेर वसई विरार नालासोपाराच्या चौका चौकात ‘नमो चहा’ असो किंवा पेढे व लाडू यांचे वाटप केले. अगदी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश करीत भाजप व सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरील नागरिकांचे तोंड गोड करण्यात मश्गुल झाले होते. यावेळी पोलिसांनी विजय मिरवणूकांना जरी बंदी घातली असली तरी महायुतीच्या हौशी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी बविआ, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या व त्यांच्या पदाधिकारी व नेत्यांची कार्यालये व यांच्या निवासस्थानी शुकशुकाट दिसला तर संध्याकाळी सुद्धा या पक्ष कार्यालयाकडे कुणी फिरकले नाही.

महायुतीचे आता पुढचे लक्ष्य विधानसभा
लोकसभेची निवडणूक जिंकून आता भाजप-शिवसेना महायुतीने पालघरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र आता खरी लढत विधानसभेत पहायला मिळेल. सध्या बविआची वसई, बोईसर व नालासोपारा असे तीन आमदार आहेत. त्यामुळे आता आमचे मुख्य उद्दिष्ट विधानसभा असून या तिन्ही मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते सक्रि य होत आहेत, अशा ही प्रतिक्रि या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून येत होत्या.

Web Title: why so silent in Bavia Party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palghar-pcपालघर